Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - योना

योना 2

Help us?
Click on verse(s) to share them!
1नंतर माशाच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली
2तो म्हणाला, “मी आपल्या आपत्तीमध्ये परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने मला उत्तर दिले; मी मृत्यूलोकाच्या पोटातून मदतीकरता हाक मारली! तू माझा आवाज ऐकलास.
3तू मला समुद्रांच्या मध्यभागी खोल टाकले, आणि प्रवाहाने मला वेढले, तुझ्या सर्व उसळत्या लाटांचा कल्लोळ माझ्यावरून गेला.
4आणि मी म्हणालो, ‘मी तुझ्या दृष्टीसमोरून टाकलेला आहे; तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन?’
5जलांनी प्राण जाईपर्यंत मला झाकले; आणि डोहाने सर्वबाजूनी मला घेरले, समुद्रातील शेवाळाने माझ्या डोक्याला लपेटले.
6मी पर्वतांच्या तळापर्यंत गेलो; पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले; तथापि माझ्या देवा परमेश्वरा, तू माझा जीव खड्डयातून वरती काढला आहे.
7जेव्हा माझा जीव माझ्या ठायी व्याकुळ झाला; तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले, आणि माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात पोहंचली.
8जे निरर्थक मूर्तींकडे आपले चित्त लावतात, ते स्वतः आपल्या दयानिधीला नाकारतात.
9परंतु मी आभार मानण्याच्या वाणीने तुझ्याकडे यज्ञ अर्पण करीन; जो नवस मी केला आहे तो मी पूर्ण करीन, तारण परमेश्वराकडूनच आहे.”
10मग परमेश्वराने त्या मोठ्या माश्याला आज्ञा केली; तेव्हा त्याने योनाला कोरडया भूमीवर ओकून टाकले.