Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 109

स्तोत्र. 109:8-16

Help us?
Click on verse(s) to share them!
8त्याचे दिवस थोडे होवोत; दुसरा त्याचा अधिकार घेवो;
9त्याची मुले पितृहीन आणि त्याची पत्नी विधवा होवो.
10त्याची मुले इकडे तिकडे भटकत आणि भीक मागत फिरोत, ती आपल्या ओसाड ठिकाणाहून दूर जाऊन निवेदन करोत.
11सावकार त्यांचे सर्वस्व हिरावून घेवो; त्याची कमाई परके लुटून घेवोत;
12त्यांना कोणीही दया देऊ नये; त्याच्या पितृहीन मुलांची कोणीही कीव करू नये.
13त्याचे वंशज कापून टाकली जावोत; पुढच्या पिढीत त्याचे नाव खोडले जावो.
14परमेश्वरास त्याच्या पूर्वजांच्या पापांची आठवण राहो. त्याच्या आईची पापे कधीही विसरली न जावोत.
15परमेश्वरापुढे त्यांचे पातक सदैव असोत; परमेश्वर त्यांचे स्मरण पृथ्वीवरून काढून टाको.
16कारण या मनुष्याने कधीही दया दाखविण्याची पर्वा केली नाही, परंतु त्याऐवजी पीडलेल्यांचा छळ आणि गरजवंत व धैर्य खचलेल्यांचा वध केला.

Read स्तोत्र. 109स्तोत्र. 109
Compare स्तोत्र. 109:8-16स्तोत्र. 109:8-16