Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र.

स्तोत्र. 54

Help us?
Click on verse(s) to share them!
1दाविदाचे स्तोत्र हे देवा, तू आपल्या नावाने मला वाचव, आणि तुझ्या सामर्थ्यात माझा न्याय कर.
2हे देवा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या शब्दाकडे कान दे.
3कारण माझ्याविरूद्ध परके उठले आहेत, आणि दयाहीन माणसे माझ्या जीवाच्या मागे लागली आहेत; त्यांनी आपल्यापुढे देवाला ठेवले नाही.
4पाहा, देव माझा मदतनीस आहे; प्रभू माझ्या जिवाला उचलून धरणाऱ्या बरोबर आहे.
5तो माझ्या शत्रूंना वाईटाची परत फेड करील; तू माझ्यासाठी आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश कर.
6मी तुला स्वखुशीने अर्पणे अर्पीण; हे परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन, कारण हे चांगले आहे.
7कारण त्याने मला प्रत्येक संकटातून सोडवले आहे; माझे डोळे माझ्या शत्रूंकडे विजयाने पाहतात.