Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र.

स्तोत्र. 124

Help us?
Click on verse(s) to share them!
1दाविदाचे स्तोत्र आता इस्राएलाने म्हणावे, जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता,
2जेव्हा लोक आमच्याविरूद्ध उठले, तेव्हा जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता तर आमच्या बाजूला कोण असते,
3जेव्हा त्यांचा क्रोध आमच्याविरूद्ध पेटला, त्यावेळी त्यांनी आम्हास जिवंत गिळून टाकले असते.
4जलांनी आम्हास धुवून दूर नेले असते; प्रवाहाने आम्हास पूर्ण झाकले असते.
5मग खवळलेल्या जलांनी आम्हास बुडवले असते.
6परमेश्वराचा धन्यवाद होवो, त्याने आम्हास त्याच्या दातांनी फाडू दिले नाही.
7पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशातून आमचा जीव मुक्त झाला आहे; पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत.
8पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण करणारा परमेश्वर त्याच्या नावामुळे आम्हास मदत मिळते.