Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 109:8-16 in Marathi

Help us?

स्तोत्र. 109:8-16 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 त्याचे दिवस थोडे होवोत; दुसरा त्याचा अधिकार घेवो;
9 त्याची मुले पितृहीन आणि त्याची पत्नी विधवा होवो.
10 त्याची मुले इकडे तिकडे भटकत आणि भीक मागत फिरोत, ती आपल्या ओसाड ठिकाणाहून दूर जाऊन निवेदन करोत.
11 सावकार त्यांचे सर्वस्व हिरावून घेवो; त्याची कमाई परके लुटून घेवोत;
12 त्यांना कोणीही दया देऊ नये; त्याच्या पितृहीन मुलांची कोणीही कीव करू नये.
13 त्याचे वंशज कापून टाकली जावोत; पुढच्या पिढीत त्याचे नाव खोडले जावो.
14 परमेश्वरास त्याच्या पूर्वजांच्या पापांची आठवण राहो. त्याच्या आईची पापे कधीही विसरली न जावोत.
15 परमेश्वरापुढे त्यांचे पातक सदैव असोत; परमेश्वर त्यांचे स्मरण पृथ्वीवरून काढून टाको.
16 कारण या मनुष्याने कधीही दया दाखविण्याची पर्वा केली नाही, परंतु त्याऐवजी पीडलेल्यांचा छळ आणि गरजवंत व धैर्य खचलेल्यांचा वध केला.
स्तोत्र. 109 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी