Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र.

स्तोत्र. 123

Help us?
Click on verse(s) to share them!
1स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या, तुझ्याकडे मी आपली दृष्टी वर लावतो.
2पाहा, जसे दासाचे डोळे आपल्या मालकाच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या मालकिणीच्या हाताकडे असतात, तसे आमचे डोळे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे लागलेले असतात.
3हे परमेश्वरा, आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर, कारण आम्ही अपमानाने भरलो आहोत.
4सुखवस्तू लोकांनी केलेली थट्टा, आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे.