Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - यहे.

यहे. 19

Help us?
Click on verse(s) to share them!
1मग तू इस्राएलाच्या पुढाऱ्यांच्या आक्रोशा विरुध्द विलाप कर.
2आणि म्हण तुझी आई कोण? सिंहीण, आपल्या छाव्यासोबत राहते तरुण सिंहाच्यामध्ये ती आपल्या छाव्याचे पालनपोषण करते.
3आणि ती आपल्या छाव्याचे पोषण करून त्यास तरुण सिंह बनवते जो आपल्या शिकारीला फाडून टाकतो. तो मनुष्यास खाऊन टाकते.
4मग राष्ट्रांना त्याची वार्ता ऐकू येते, तो त्याच्याच पाशात अडकला जातो, आणि त्यास आकडीने धरुन मिसरात घेऊन गेले.
5मग जरी तिने हे पाहिले तरी त्याची परतण्याची ती वाट बघते, तिची आशा आता निघून गेली, मग तिने आपल्या दुसऱ्या छाव्याला घेतले आणि त्याची वाढ तरुण सिंह होण्यास केली.
6हा तरुण सिंह इतर सिंहाच्यामध्ये हिंडू फिरु लागतो, तो तरुण सिंह असता त्याने आपल्या शिकारीला फाडून टाकणे शिकला, त्याने मनुष्यांना खाऊन टाकले.
7मग त्याने विधवांवर बलात्कार केले आणि शहराला देशोधडीला लावले, त्याची भूमी पूर्णपणे बेबंदशाहीने भरली कारण त्याच्या गर्जनेचा आवाज दुमदुत होता.
8सर्व प्रांतातून एकवटून सर्व देशाचे लोक त्याच्या विरोधात जमले; त्यांनी त्याच्या भोवती जाळे टाकले. त्यास पाशात पकडले.
9त्यास पिंजऱ्यात कोंडून ताळेबंद केले आणि बाबेलाच्या राज्यापुढे आणले, त्यांना त्यास तटबंदी असलेल्या डोंगरावर नेले यास्तव त्याचा स्वर इस्राएलाच्या घराण्याला आता ऐकू जाणार नाही.
10तुझी आई पाण्याजवळ लावलेली द्राक्षाच्या झाडासारखी होती ती फलद्रुप व फांद्यांनी बहरलेली अशी होती कारण तेथे भरपूर पाणी होते.
11तिच्याकडे न्यायाचा बळकट राजदंड आहे आणि तिची उंची दाट रानाच्या फांद्यांच्या वर गेलेली होती.
12पण द्राक्षाच्या झाडाला मुळासकट त्वेषाने उपटून टाकले आणि भूमीवर फेकून दिले, पूर्वेकडील वाऱ्याने तिच्या फळांना सुकून टाकले.
13मग तिला ओसाड प्रदेशात लावले जेथे पाऊस नाही आणि तहान आहे.
14तिच्या दाट फांद्यांना अग्नीने होरपळले आणि फळे खाऊन टाकीली, तेथे आता बळकट फांदी उरली नाही, न्यायाचा राजदंड नाही, तेथे आक्रोश आणि रडगाणे आहे.