Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - यहे.

यहे. 9

Help us?
Click on verse(s) to share them!
1तेव्हा देवाने मोठ्या आवाजाने मला हाक मारली, आणि म्हणाले, “शहर रक्षकाला येऊ द्या, प्रत्येकाच्या हाती हल्ला व हानी करणारे हत्यार असेल.”
2मग पहा! उत्तर दिशेने प्रवेश व्दारातून सहा जण आपल्या हाती जनावर ठार करणारे हत्यार आणि अंगात तागाचे वस्त्र परिधान केलेले, एका बाजूस शास्रांचे उपकरण होते, मग ते जाऊन पितळेच्या वेदीजवळ उभे राहीले.
3मग इस्राएली देवाचे गौरवी तेज करुबा वरुन निघून घराच्या उंबरठ्यावर आले. त्याने तागाचे वस्त्र परीधान केलेले ज्यांच्या हाती एका बाजूला शास्रांचे उपकरण होते त्यांना बोलावले.
4परमेश्वर देव त्यांना म्हणाला, “यरूशलेमेच्या मध्य भागातून प्रवेश करा, जे पुरुष विव्हळ झाले, त्यांच्या माथ्यावर खुण करा, आणि शहरात केलेल्या सगळ्या अपवित्र गोष्टींसाठी उसासे टाका.”
5ऐकायला जाईल अशा अंतरावर मग तो बोलला शहरात त्यानंतर प्रवेश कर, व मारुन टाक, कुणावरही दया करु नकोस.
6म्हातारे असो, तरुण, कुमारी, लहान मुले किंवा स्त्रिया सर्वांना मारुन टाका. पण ज्याच्या माथ्यावर खुण आहे त्याच्याजवळ जाऊ नका. माझ्या पवित्र ठिकाणाहून सुरुवात करा, मग म्हाताऱ्यापासून सुरुवात केली व माझ्या निवासापुढे आले.
7तो त्यांना म्हणाला, “आक्रमण करा, मंदिर भ्रष्ट करा, घरे उध्वस्त करा, आणि वेशी मृतांना व्यापून टाका” मग ते यरुशमेल नगराच्या बाहेर जाऊन हल्ला करतील.
8ते हल्ला करीत असतांना, मला स्वतःला एकटे वाटले. आणि मी उपडा पडून रडलो, हे प्रभू परमेश्वर देवा तुझ्या क्रोधाच्या ओतणीने तू सर्व उरलेल्या यरूशलेमातील इस्राएलाचा विध्वंस करशील काय?
9तो मला म्हणाला, “इस्राएल आणि यहूदाचे अपराध फार वाढत आहेत, शहर व भूमी रक्ताने भरलेली आहे आणि ते दुरुपयोग करून म्हणतात, परमेश्वर देव आम्हास विसरला तो आम्हास बघत नाही.
10म्हणून मी त्यांच्यावर दया दृष्टी करणार नाही. त्यांची दया करणार नाही. त्यावर त्यांच्या कृत्यांचे फळ त्यांच्या माथी देईन.”
11पहा! तागाचे वस्त्र घातलेला शास्त्र्याचे अवजार हाती घेऊन वापस येत असता त्याने बातमी दिली, “तू मला सांगीतलेले सर्व काही पार पाडले आहे.”