Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - दानि. - दानि. 2

दानि. 2:14-23

Help us?
Click on verse(s) to share them!
14तेव्हा दानीएलाने अंगरक्षकांचा प्रधान अर्योक जो, बाबेलातील ज्ञानांचा घात करायला निघाला होता, त्यास दुरदर्शीपणाने आणि विचारपूर्वक म्हणाला.
15दानीएल राजाच्या सेनापतीला म्हणाला, “राजाकडून हा असा तातडीचा हुकूम का निघाला?” तेव्हा अर्योकने दानीएलास काय घडले ते सांगितले.
16मग दानीएलाने आत जाऊन राजास विनंती केली की, “त्याला समय द्यावा म्हणजे त्यास महाराजाला त्याच्या स्वप्नाचा उलगडा सांगता येईल.”
17तेव्हा दानीएललाने आपल्या घरात जाऊन आपले सोबती हनन्या, मीशाएल व अजऱ्या यांना ती गोष्ट कळवली,
18त्याने त्यांना विनंती केली की, या रहस्याविषयी स्वर्गीय देवाने दया करावी असे त्यांनी देवाजवळ मागावे म्हणजे बाबेलाच्या इतर ज्ञान्यांसोबत त्याचा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा घात होऊ नये.
19त्या रात्री दानीएलास दृष्टांताद्वारे, या रहस्याचा उलगडा झाला. त्यानंतर त्याने स्वर्गीय देवाचे स्तवन केले.
20आणि तो म्हणाला, “देवाच्या नामाचे सदासर्वदा स्तवन होवो, कारण ज्ञान आणि सामर्थ्य त्याचे आहे.”
21तो समय आणि ऋतु बदलतो, तो राजास काढतो आणि दुसऱ्यास सिंहासनावर बसवून राजे करतो; तो ज्ञान्यास आणि विवेकवंतास शहाणपण देतो.
22तो गुढ आणि गहन गोष्टी प्रगट करतो, कारण अंधारात काय आहे हे तो जाणतो, आणि प्रकाश त्यामध्ये वसतो.
23माझ्या पूर्वजाच्या देवा, मी तुझे आभार मानतो आणि तुझे स्तवन करतो, कारण तू मला ज्ञान आणि सामर्थ्य दिले; आणि जे आम्ही तुझ्याजवळ मागितले ते सर्व तू आता मला कळवले आहे म्हणून मी तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करतो, कारण तू राजाची गोष्ट आम्हास कळविली आहे.

Read दानि. 2दानि. 2
Compare दानि. 2:14-23दानि. 2:14-23