Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - यिर्म. - यिर्म. 51

यिर्म. 51:35-61

Help us?
Click on verse(s) to share them!
35मजवर व माझ्या कुटूंबावर केलेला जुलूम बाबेलाविरूद्ध उलटो, असे सियोनामध्ये राहणारे म्हणतील. “माझे रक्त पाडल्याचा दोष खास्द्यांच्या रहिवाश्याविरूद्ध फिरो.” असे यरूशलेम म्हणेल.
36म्हणून परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी तुझ्या दाव्याविषयी बाजू मांडीन आणि तुझ्यासाठी सूड घेईन. कारण मी बाबेलाचे समुद्र आटवीन आणि तिचे झरे सुकवून टाकीन.
37बाबेल पडक्या इमारतीच्या दगडाविटांची रास, कोल्ह्यांचे राहण्याचे ठिकाण, दहशत, चेष्टेचा विषय, निर्जन स्थान असे होईल.
38“बाबेली जमून तरुण सिंहाप्रमाणे गर्जना करतील. ते सिंहाच्या छाव्याप्रमाणे गुरगुरतील.
39जेव्हा ते अधाशीपणाने तप्त होतील, तेव्हा मी त्यांना मेजवानी देईन. मग त्यांनी उल्लास करून निरंतरची झोप घ्यावी व जागे होऊ नये म्हणून मी त्यांना मस्त करीन.” असे परमेश्वर म्हणतो.
40“मी त्यांना कोकरासारखे, मेंढे व बोकड यांच्यासारखे खाली कत्तल करण्यास घेऊन जाईन.
41शेशख कसे काबीज झाले आहे! सर्व जगाचा प्रशंसा असा कसा धरला गेला आहे. राष्ट्रांत बाबेल कशी उध्वस्त जागा झाली आहे.
42बाबेलावर समुद्र आला आहे! ती त्याच्या गरजणाऱ्या लाटांनी झाकली आहे.
43तिची नगरे नाश झाली आहेत, कोरडी भूमी आणि ओसाड प्रदेश झाली आहे, आणि जिच्यात कोणी मनुष्य राहत नाही आणि कोणी मनुष्यप्राणी त्यातून जात नाही
44म्हणून बाबेलात मी बेलाला शिक्षा करीन; त्यांने जे गिळले आहे ते मी त्याच्या तोंडातून बाहेर आणील, आणि राष्ट्रे त्याच्याकडे आपल्या संततीला बरोबर घेऊन वाहणार नाही. बाबेलाची भिंत पडेल.
45माझ्या लोकांनो, बाबेलाच्या शहरातून बाहेर या. माझ्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येकजण आपला जीव वाचवा.
46देशातील जे वर्तमान ऐकण्यात येईल त्यांने भिऊ नका अथवा आपले हृदय खचू देऊ नका. कारण एका वर्षात वर्तमान येईल. यानंतर पुढच्या वर्षात वर्तमान येईल, आणि देशात हिंसाचार होईल. राज्यकर्ते राज्यकर्त्याविरूद्ध होतील.
47यास्तव, पाहा, दिवस येत आहेत की, जेव्हा मी बाबेलाच्या कोरीव मूर्तींना शिक्षा करील. तेव्हा तिचा संपूर्ण देश लज्जित होईल, आणि तिचे सर्व वधलेले तिच्यामध्ये पडतील.
48मग आकाश व पृथ्वी आणि त्यामध्ये जे काही आहे ते सर्व बाबेलावर आनंद करतील. कारण तिचा नाश करणारा उत्तरेकडून येईल.” परमेश्वर असे म्हणतो.
49बाबेलाने जसे इस्राएलाचे वधलेले पडतील असे केले आहे, तसे तिच्या देशात वधलेले सर्व बाबेलात पडतील.
50जे तुम्ही तलवारीपासून वाचले आहात, दूर जा! थांबू नका. दुरून परमेश्वराचे स्मरण करा. यरूशलेमे तुमच्या मनात येवो.
51“आम्ही अपमान ऐकला आहे, म्हणून आम्ही लज्जित झालो आहोत. लाजेने आमची तोंडे झाकली आहेत, कारण परमेश्वराच्या घरातील पवित्र स्थानात परक्यांनी प्रवेश केला आहे.”
52यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, मी तिच्या कोरीव मूर्तींना शिक्षा करीन, आणि तिच्या देशात जखमी झालेले कण्हतील.
53कारण जरी बाबेल आकाशापर्यंत वर चढली किंवा जरी तिने आपले बळाचे उंचस्थान मजबूत केले, तरी माझ्याकडून नाश करणारे तिच्यावर येतील. असे परमेश्वर म्हणतो.
54“बाबेलातून दुःखाच्या आरोळीचा, खास्द्यांच्या देशातून मोठा कोसळण्याचा आवाज येतो.
55कारण परमेश्वर बाबेलाचा नाश करत आहे. तिच्यातील मोठा आवाज तो नष्ट करत आहे. त्यांचे शत्रू बहुत जलांच्या लाटांप्रमाणे गर्जना करीत आहेत. त्यांच्या गर्जनेचा गोंगाट फार बलवान होत आहे.
56कारण तिच्यावर, म्हणजे बाबेलाविरूद्ध नाश करणारा आला आहे, आणि तिचे योद्धे पकडले गेले आहेत. त्यांचे धनुष्ये मोडली आहेत, कारण परमेश्वर सूड घेणारा देव आहे. तो खचित प्रतिफल भरून देईल.
57कारण मी तिचे सरदार, तिचे ज्ञानी, तिचे अधिकारी आणि तिचे सैनिक मस्त होतील व ते अंत नसणाऱ्या झोपेत झोपतील आणि कधी जागे होणार नाहीत.” असे राजाचे म्हणणे आहे; सेनाधीश परमेश्वर त्याचे नाव आहे.
58सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “बाबेलाची जाड तटबंदी जमीनदोस्त केली जाईल, आणि तिची उंच प्रवेशद्वारे जाळली जातील. मग तिच्या मदतीला येणाऱ्या लोकांची मेहनत निरुपयोगी होईल. जी प्रत्येकगोष्ट राष्ट्र तिच्यासाठी करण्याचा प्रयत्न करेल ती जाळण्यात येईल.”
59महसेयाचा मुलगा नेरीया याचा मुलगा सारया हा जेव्हा यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याबरोबर त्याच्या राज्याच्या चौथ्या वर्षी, बाबेलास गेला तेव्हा जे वचन यिर्मया संदेष्ट्याने त्यास आज्ञापिले ते हे. कारण सराया हा प्रमुख अधिकारी होता.
60यिर्मयाने बाबेलावर जे सर्व अरिष्ट येणार होते ते म्हणजे बाबेलाविषयीची ही सर्व वचने एका गुंडाळीवर लिहिली होती.
61यिर्मया सरायाला म्हणाला, “जेव्हा, तू बाबेलास जाशील तेव्हा ही सर्व वचने वाचण्याची खात्री करून घे.

Read यिर्म. 51यिर्म. 51
Compare यिर्म. 51:35-61यिर्म. 51:35-61