Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लूक - लूक 3

लूक 3:4-14

Help us?
Click on verse(s) to share them!
4यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हे झालेः “रानात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी, ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा.
5प्रत्येक दरी भरली जाईल, आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल, वांकडी सरळ होतील, आणि खडबडीत मार्ग सपाट केले जातील
6आणि सर्व मनुष्यप्राणी देवाचे तारण पाहतील.’”
7त्याच्याकडून बाप्तिस्मा करून घेण्यासाठी येणाऱ्या जमावाला योहान म्हणाला; “अहो, विषारी सापाच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्हास कोणी सावध केले?
8पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या आणि आपल्या मनात असे म्हणू नका की, ‘अब्राहाम आमच्या पित्यासारखा आहे.’ कारण मी तुम्हास सांगतो की, अब्राहामासाठी या दगडापासून मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे.
9आताच झाडांच्या मुळांशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. म्हणून प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाईल.”
10नंतर जमावातील लोकांनी त्यास विचारले, “आता आम्ही काय करावे?”
11त्याने उत्तर दिले, “ज्याच्याकडे दोन अंगरखे असतील त्याने ज्याला नाही त्यास एक द्यावा आणि ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे.”
12काही जकातदारही बाप्तिस्मा करून घ्यावयास आले होते. ते म्हणाले, “गुरुजी, आम्ही काय करावे?”
13तो त्यांना म्हणाला, तुम्हास जे नेमून दिले आहे त्यापेक्षा जास्त पैसे घेऊ नका.
14काही शिपायांनीसुद्धा त्यास विचारून म्हटले, “आणि आमच्या बद्दल काय, आम्ही काय करावे?” तो त्यांना म्हणाला, “कोणाकडून जबरदस्तीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटा आरोप करू नका, तुम्हास मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा.”

Read लूक 3लूक 3
Compare लूक 3:4-14लूक 3:4-14