Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - ईयो.

ईयो. 5

Help us?
Click on verse(s) to share them!
1“आता आरोळी मार, तुला उत्तर देईल असा कोण आहे? असा कोण एक धार्मिक आहे का ज्याच्याकडे तू जावे?
2मूर्ख मनुष्याचा राग त्यास मारुन टाकतो, जळफळाट मुर्खाला ठार मारतो.
3मी मूर्ख व्यक्तीस मुळावलेले पाहीले, परंतु अचानक मी त्याच्या घराचा तिरस्कार केला.
4त्याची मुले सुरक्षिततेपासून फार दूर आहेत, ते शहराच्या वेशीत चिरडले जातील. त्यांना तारणारा कोणीही राहणार नाही
5भुकेल्या मनुष्यांनी त्याची उभी पिके खाऊन टाकली, काट्याकुटयात वाढलेले धान्यही लोकांनी सोडले नाही, लोभी मनुष्यांनी सर्वकाही नेले.
6अडचणी मातीतून येत नाहीत, किंवा संकटे रानातून उगवत नाहीत.
7परंतू जशा ठिणग्या वर उडतात, तसा मनुष्य स्वतःहा विघ्न निर्माण करतो.
8परंतू माझ्यासाठी, मी स्वतःह देवाकडेच वळलो असतो, त्याच्याकडे मी माझे गाऱ्हाने कबूल केले असते.
9तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो, त्याच्या अद्भुत गोष्टींची सीमा नाही.
10तो पृथ्वीवर पाऊस देतो. आणि शेतांवर पाणी पाठवतो.
11तो नम्र लोकांस उच्चस्थानी बसवतो आणि जे राखेत बसून शोक करतात त्यांना तो सुरक्षीत उठवतो.
12तो धूर्तांचे कार्य निष्फळ करतो, म्हणजे त्यांच्या हांताचे कट सिध्दीस जाणार नाहीत.
13तो शहाण्यास त्याच्याच धुर्ततेच्या जाळ्यात अडकवितो, तो हूशार लोंकाच्या मसलती लवकर संपुष्टात आणतो.
14त्यांचा भर दिवसाच अंधराशी सामना होतो, दिवसा मध्यान्ह्यात ते रात्र असल्यासारखे चाचपडतात.
15त्यांच्या मुखांतील तलवारीपासून तो दरीद्री मनुष्यास, आणि बलंवताच्या हातातून गरजवंत मनुष्यास सोडवतो
16म्हणून दरिद्री मनुष्यास आशा आहे, आणि अन्याय आपले तोंड बंद करते.
17पाहा, ज्या मनुष्याला देव दुरूस्त करतो तो सुखी आहे, म्हणून सर्वशक्तिमानाच्या शिक्षेचा अवमान करु नकोस.
18तोच जखम करतो आणि नंतर तोच पट्टी बांधतो. तो जखमा करतो आणि नंतर त्याच्याच हाताने बरे करतो.

19सहा संकटामधून तो तुझा बचाव करील, खरोखर, सातही संकटात, दुष्ट तुला स्पर्श करणार नाही.
20दुष्काळात (अवर्षण) तो तुला मृत्यूपासून आणि लढाईत तलवारीपासून वाचवेल.
21जिभेच्या दुःखदायी वाऱ्यापासून तू झाकला जाशील, आणि विनाश तूझ्यावर येईल तेव्हा तू त्यास भिणार नाहीस.
22तू विनाशात व दुष्काळात (अवर्षण) हसशील. आणि तुला रानपशूंची भीती वाटणार नाही.
23तुझ्या भूमीतील पाषाणाशीही तुझा करार होईल, जंगली पशूशीही तू शांतीने राहशील
24तुला समजेल तुझा तंबू त्याच्यामध्ये सुरक्षित आहे, तू तुझ्या कळपाची पाहणी करशील आणि तुला काही कमतरता आढळणार नाही.
25तुझे घराणे समृध्द होईल. वनातील कुरणासारखी तुझी संतती वाढेल असे तू पाहाशील.
26जशी कापणीच्या वेळी वाळलेली गव्हाची पेंढी मळणीसाठी आणतात तसा तू वयोवृध्द होऊन कबरेत येशील.
27पाहा, आम्ही या साऱ्यांचा अभ्यास केला आहे आणि ते सर्व खरे आहे. म्हणून तू आमचे ऐक. आणि त्यातून स्वत:साठी काही शिक.”