Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - रोम. - रोम. 14

रोम. 14:11-17

Help us?
Click on verse(s) to share them!
11कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून, प्रत्येक गुडघा मला नमन करील, आणि प्रत्येक जीभ देवाचे स्तवन करील.’
12तर मग आपल्यातला प्रत्येकजण देवाला आपआपला हिशोब देईल.
13तर आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये. पण असे ठरवू की, कोणीही आपल्या बंधूच्या मार्गात अडखळण किंवा पडण्यास कारण होईल असे काही ठेवू नये.
14मी जाणतो व प्रभू येशूमुळे मी मानतो की, कोणतीही गोष्ट मूळची अशुद्ध नाही, पण जो कोणी कोणतीही गोष्ट अशुद्ध मानतो त्यास ती अशुद्ध आहे.
15पण जर तुझा बंधू तुझ्या अन्नामुळे दुःखी होतो तर तू आता प्रीतीस अनुसरून चालत नाहीस असे झाले. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या अन्नामुळे तू नाश करू नकोस.
16म्हणून तुम्ही जे चांगले स्वीकारले आहे त्याची निंदा होऊ देऊ नका.
17कारण खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे.

Read रोम. 14रोम. 14
Compare रोम. 14:11-17रोम. 14:11-17