Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - मला.

मला. 1

Help us?
Click on verse(s) to share them!
1परमेश्वराकडून मलाखीच्याहस्ते इस्राएलासाठी आलेल्या संदेशाची घोषणा.
2परमेश्वर म्हणाला, “माझे तुमच्यावर प्रेम आहे.” पण तुम्ही म्हणालात, “कशावरून तू आमच्यावर प्रेम करतोस?” परमेश्वर म्हणाला, “एसाव याकोबचा भाऊ होता. बरोबर? पण मी याकोबला निवडले.
3आणि मी एसावचा स्वीकार केला नाही. मी त्याच्या डोंगरी प्रदेशांचा नाश केला. एसावच्या देशाचा नाश झाला, आता तिथे फक्त रानटी कोल्हे राहतात.”
4अदोम असे म्हणाला, “आमचा नाश झाला आहे, तरी पण आम्ही परत जाऊन जे उध्वस्त झाले आहे ते बांधू.” पण सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “ते बांधतील पण मी पाडून टाकीन.” आणि लोक त्यांना दुष्टांचा देश म्हणतील, हे ते लोक आहेत ज्यांच्यावर परमेश्वर कायमचा रागावला आहे.
5तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील आणि तू म्हणशील, “परमेश्वर इस्राएलाच्या सीमेपलीकडे थोर मानला जावो.”
6सेनाधीश परमेश्वर तुझ्याशी असे बोलतो, “मुले वडिलांना आणि सेवक आपल्या धन्याला मान देतो. मग मी, जो तुमचा पिता आहे, त्या माझा सन्मान कुठे आहे? आणि मी जर तुमचा धनी आहे, तर मग माझा परम आदर कुठे आहे? अहो याजकांनो, तुम्ही माझ्या नावाचा मान राखत नाही. पण तुम्ही म्हणता ‘तुझ्या नावाचा मान आम्ही कसा राखला नाही?’
7तुम्ही अशुद्ध भाकरी माझ्या वेदीवर अर्पण करता. आणि म्हणता, ‘कशामुळे आम्ही तुला विटाळवीले?’ परमेश्वराचा मेज तुच्छ आहे, असे बोलून तुम्ही ते विटाळवता.
8‘जेव्हा तुम्ही यज्ञ करण्यासाठी अंधळा पशू अर्पण करता, तेव्हा हे वाईट नाही काय? आणि जेव्हा तुम्ही लंगडा किंवा रोगीष्ट पशू अर्पण करता तेव्हा ते वाईट नाही काय? तू आपल्या अधिकाऱ्यासमोर हे सादर कर, तो हे स्वीकार करील का? अथवा तो तुझ्यावर अनुग्रह करेल का?’” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
9आणि आता तुम्ही देवा कडून अनुग्रह मागता, ह्यासाठी की तो आमच्यासाठी दयावान असेल. अशा अर्पणांसह तो तुमच्यातल्या एकाला तरी ग्रहण करेल काय? सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
10“अहा! तुम्ही माझ्या वेदीवर अग्नी पेटवू नये म्हणून दारे बंद करील असा तुम्हामध्ये कोणी असता तर किती चांगले झाले असते! मी तुमच्या हातातले अर्पण स्विकारणार नाही, कारण तुम्हा विषयी मी आनंदी नाही,” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
11“कारण सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या मावळतीपर्यंत माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर होईल; प्रत्येक ठिकाणी सर्व माझ्या नावाला धूप अर्पितील व शूद्ध अर्पण करतील. कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये महान होईल.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
12“परंतु परमेश्वराचा मेज विटाळलेला आहे, आणि त्याचे फळ व त्याचे अन्न तिरस्कारयुक्त आहे, असे म्हणण्याने तुम्ही ते अपवित्र केले आहे.
13तुम्ही असेही म्हणता की, हे किती कंटाळवाणे आहे, आणि त्याविषयी तुम्ही तुच्छतेने कुरकुर करता,” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही जे जुलमाने लुटून आणलेले किंवा लंगडे किंवा रोगी या प्रकारचे तुमचे अर्पण आणता; तर आता हे मी तुमच्या हातातून स्वीकार करावे काय?
14तर जो कोणी आपल्या कळपात नर असतांना त्याचा नवस करतो आणि दोष असलेला पशू परमेश्वरास यज्ञ म्हणून अर्पण करतो तो फसवणारा शापित असो. कारण मी थोर राजा आहे आणि राष्ट्रे माझ्या नावाची भीती धरतात. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.