Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - 1 इति.

1 इति. 13

Help us?
Click on verse(s) to share them!
1दावीदाने हजारांचे आणि शंभरांचे सेनापती यापैकी प्रत्येक पुढारी यांचा सल्ला घेतला.
2मग दावीदाने इस्राएलमधील सर्व मंडळीस म्हटले. “तुम्हास जर हे योग्य वाटत असेल आणि आपला देव परमेश्वर याच्याकडून हे असेल तर आपले भाऊ, इस्राएलाच्या सर्व प्रदेशात राहिलेले आहेत त्यास आपापल्या नगरांत व खेड्यांत त्यांच्याबरोबर जे याजक आणि लेवी आहेत त्यांना आपणाकडे एकत्र जमण्यास त्यांच्याकडे दूत पाठवू.
3आपल्या देवाचा कोश आपणाकडे पुन्हा आणू. शौल राज्य करत असताना आपण त्याचा शोध केला नाही.”
4तेव्हा सर्व मंडळीने या गोष्टी करण्याची सहमती दिली कारण ती गोष्ट सर्व लोकांच्या दृष्टीने बरोबर होती.
5किर्याथ-यारीमाहून देवाचा कोश आणण्यासाठी दावीदाने मिसरमधील शीहोर नदीपासून लेबो हमाथच्या प्रदेशापर्यंत पसरलेल्या सर्व इस्राएल लोकांस एकत्र जमवले.
6करुबांवरती राहणारा देवाचा कोश, ज्याला परमेश्वर देवाचे नाव ठेवले आहे तो, यहूदातील बाला म्हणजेच किर्याथ-यारीम येथून आणावा म्हणून दावीदासह सर्व इस्राएली तिकडे चढून वर गेले.
7मग त्यांनी देवाचा कोश अबीनादाबाच्या घरातून काढून, तो नव्या गाडीवर ठेवला. उज्जा आणि अह्यो हे दोघेजण ही गाडी हाकत होते.
8दावीद आणि सर्व इस्राएल आपल्या सर्व शक्तीने देवापुढे जल्लोष करत चालले होते. ते स्तुतिगीते गात, वीणा, सतार, डफ झांजा, कर्णे इत्यादी वाद्ये वाजवत ते चालले होते.
9किदोनाच्या खळ्यापर्यंत ते पोहचले. तेव्हा गाडी ओढणारे बैल अडखळले. तेव्हा उज्जाने कोश धरण्यास हात पुढे केला.
10तेव्हा परमेश्वराचा उज्जावर कोप भडकला व उज्जाने कोशाला हात लावला म्हणून त्याने त्यास मारले आणि तेथे तो देवासमोर मेला.
11परमेश्वराने उज्जाला असा मार दिला. याचे दावीदाला वाईट वाटले. तेव्हापासून आजपर्यंत त्या ठिकाणाचे नाव पेरेस-उज्जा असे आहे.
12दावीदाला त्यादिवशी देवाची भीती वाटली. तो म्हणाला, “आपल्या घरी मी देवाचा कोश कसा आणू?”
13त्यामुळे दावीदाने दावीद नगरात तो कोश आणला नाही, पण तो ओबेद-अदोम गीत्ती याच्या घरात एकाबाजूला नेऊन ठेवला.
14मग देवाचा कोश ओबेद-अदोम याच्या घरात तीन माहिने राहिला. परमेश्वराने त्याच्या घराला आणि त्याचे जे काही होते त्या सगळ्याला आशीर्वादित केले.