Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - 2 इति.

2 इति. 3

Help us?
Click on verse(s) to share them!
1यरूशलेम येथील मोरिया डोंगरावर शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधायला सुरुवात केली. शलमोनाचे पिता दावीद यांना परमेश्वराने याच मोरिया डोंगरावर दर्शन दिले होते. दावीदाने योजनापुर्वक तयार करून ठेवलेल्या जागेवर शलमोनाने मंदिर बांधले. ही जागा म्हणजे अर्णान यबूसीचे खळे होय!
2आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षातल्या दुसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी शलमोनाने कामाला सुरुवात केली.
3शलमोनाने बांधायला घेतलेल्या परमेश्वराच्या मंदिराच्या पायाची मोजमापे अशी: हा पाया साठ हात लांब आणि वीस हात रुंद होता. तेव्हा प्रचलित असलेले जुने क्युबिट परिमाण त्याने वापरले होते.
4मंदिराच्या समोरील द्वारमंडपाची लांबी वीस हाथ असून ह्याच्या रूंदीशी जुळणारी होती. त्याची उंची देखील विस हाथ होती. त्याची आतील बाजू शलमोनाने शुद्ध सोन्याने मढवली होती.
5मंदिरातील मुख्य दालनाच्या छतास त्याने देवदारुच्या फळ्या बसवल्या. त्यावर शलमोनाने सोन्याचा पत्रा चढवला आणि त्यावर खजुरीची झाडे व साखळ्या कोरुन काढल्या
6मौल्यवान रत्ने जडवून त्याने मंदिराच्या सौंदर्यात भर घातली यामध्ये उपयोगात आणलेले सोने पर्वाइमचे होते.
7मंदीराच्या तुळया, दाराचे खांब, भिंती, दरवाजे हे मंदिराचे आतले भागही शलमोनाने सोन्याने मढवले. भिंतींवर त्याने करुब कोरले.
8यानंतर शलमोनाने मंदिरातला अत्यंत पवित्र गाभारा बांधला. हे अत्यंत पवित्रस्थान वीस हात लांब आणि वीस हात रुंद होते. मंदिराइतकीच त्याची रुंदी होती. गाभाऱ्याच्या भिंतीही शलमोनाने सोन्याने मढवल्या. हे एकंदर सहाशे किक्कार सोने होते.
9सोन्याच्या खिळ्यांचे वजन पन्नास शेकेल एवढे होते. वरच्या मजल्यावरची दालने ही शलमोनाने सोन्याने मढवली.
10अत्यंत पवित्र गाभाऱ्यात बसवण्यासाठी शलमोनाने दोन करुब घडवले. हे करुबही कारागिरांनी सोन्याने मढवले.
11करुबांच्या एकेका पंखाची लांबी पाच हात होती. त्यांची एकंदर लांबी वीस हात एवढी होती. पाहिल्या करुबाचा पाच हात लांबीचा एक पंख दालनाच्या एका बाजूच्या भिंतीला स्पर्श करत होता तर दुसरा पाच हात लांबीचा पंख दुसऱ्या करुबाच्या एका पंखाला.
12आणि दुसऱ्या करुबाचा दुसरा पाच हात लांबीचा पंख दालनाच्या दुसऱ्या भिंतीला स्पर्श करत होता.
13अशाप्रकारे करुबांच्या पंखानी वीस हात एवढे अंतर व्यापलेले होते. हे करुब पवित्र गाभाऱ्याकडे तोंड करून उभे होते.
14निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या लोकरीचा व तलम सुताचा पडदा करून घेऊन शलमोनाने त्यावरही करुब करवून घेतले.
15मंदिरासमोर शलमोनाने दोन स्तंभ उभारले. प्रत्येक स्तंभ पस्तीस हात उंच होते. त्यांच्यावरचे कळस प्रत्येकी पाच हात उंचीचे होते.
16शलमोनाने साखळ्या करून त्या कळसांवर ठेवल्या. या साखळ्यांना त्याने कलाकुसर म्हणून शंभर सुशोभित डाळिंबे लावली.
17हे स्तंभ मंदिरासमोर डाव्याउजव्या हाताला उभे केले. उजव्या बाजूच्या खांबाला शलमोनाने याखीम (संस्थापक) आणि डावीकडच्या खांबाला बवाज (सामर्थ्यवान) अशी नावे दिली.