Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - यिर्म. - यिर्म. 32

यिर्म. 32:33-37

Help us?
Click on verse(s) to share them!
33“त्यांचे तोंड फिरविण्याऐवजी त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली, जरी मी त्यांना अति उत्सुकतेने शिकविले. मी त्यांना शिकविण्याचा प्रयत्न केला, पण त्यातील एकानेही बोध स्विकारण्यास माझे ऐकले नाही.
34नंतर त्यांनी ज्या घरास माझे नाव ठेवले आहे ते अशुद्ध करण्यास त्यांच्या निंद्य गोष्टी आणून ठेवल्या.
35आणि त्यांनी बआल देवाची जी उंचस्थाने हिन्नोमाच्या मुलाच्या खोऱ्यात आहेत ती त्यांनी आपली मुले व मुली यांचा मोलख देवाला होमार्पण करण्यासाठी बांधली. हे काही करण्याची आज्ञा मी त्यांना कधीच दिली नव्हती. आणि यहूदाने पाप करावे म्हणून त्यांनी किळसवाणी गोष्टी कराव्या, असे माझ्या कधीही मनातसुद्धा आले नव्हते.
36म्हणून आता, ज्या नगराविषयी तुम्ही म्हणता, हे तलवार, दुष्काळ व मरीने बाबेलाच्या राजाच्या हाती देण्यात येईल त्या नगराविषयी मी, परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो,
37पाहा, ज्या प्रत्येक देशात मी आपल्या क्रोधाने, कोपाने आणि महारोषाने त्यांना घालवून दिले आहे, तेथून मी त्यांना गोळा करून परत येथे आणीन आणि त्यांना सुरक्षित राहण्याची शक्ती देईन.

Read यिर्म. 32यिर्म. 32
Compare यिर्म. 32:33-37यिर्म. 32:33-37