Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 148

स्तोत्र. 148:1-14

Help us?
Click on verse(s) to share them!
1परमेश्वराची स्तुती करा. आकाशातून परमेश्वराची स्तुती करा; उंचामध्ये त्याची स्तुती करा.
2त्याच्या सर्व देवदूतांनो त्याची स्तुती करा; त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा.
3सूर्य व चंद्रहो त्याची स्तुती करा; तुम्ही सर्व चमकणाऱ्या ताऱ्यांनो, त्याची स्तुती करा.
4आकाशावरील आकाशांनो आणि आकाशावरील जलांनो त्याची स्तुती करा.
5ती परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत. कारण त्याने आज्ञा केली आणि त्यांची निर्मिती झाली.
6त्याने ती सर्वकाळासाठी व कायम स्थापली; त्याने नियम ठरवून दिला तो कधीही बदलणार नाही.
7पृथ्वीवरून परमेश्वराची स्तुती करा. तुम्ही समुद्रातील प्राण्यांनो आणि सर्व महासागरांनो,
8अग्नी आणि गारा, बर्फ आणि धुके, त्याचे वचन पूर्ण करणारे सर्व वादळी वारा,
9पर्वत आणि सर्व टेकड्या, फळझाडे व सर्व गंधसरू,
10जंगली आणि पाळीव प्राणी, सरपटणारे प्राणी आणि उडणारे पक्षी,
11पृथ्वीवरचे राजे आणि सर्व राष्ट्रे, अधिपती आणि पृथ्वीतले सर्व न्यायाधीश,
12तरुण पुरुष आणि तरुण स्रिया, वृद्ध आणि मुले दोन्ही,
13ही सर्व परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत, कारण केवळ त्याचेच नाव उंचावलेले आहे; आणि त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशाच्या वर पसरविले आहे.
14त्याने आपल्या लोकांचे शिंग उंचाविले आहे; कारण तो आपल्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याच्याजवळ असलेल्या इस्राएलाच्या लोकांस स्तुतीपात्र आहे. परमेश्वराची स्तुती करा.

Read स्तोत्र. 148स्तोत्र. 148
Compare स्तोत्र. 148:1-14स्तोत्र. 148:1-14