Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 141

स्तोत्र. 141:1-6

Help us?
Click on verse(s) to share them!
1दाविदाचे स्तोत्र हे परमेश्वरा, मी तुला मोठ्याने ओरडून हाक मारतो; माझ्याकडे त्वरेने ये. जेव्हा मी तुला हाक मारतो तेव्हा माझे ऐक.
2माझी प्रार्थना तुझ्यासमोर धुपाप्रमाणे, ती माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो.
3हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव; माझ्या ओठांचे द्वार सांभाळ.
4अन्याय करणाऱ्या मनुष्यांबरोबर मी त्याच्या पापमय कार्यात सहभागी होऊ देऊ नकोस, जे दुष्कर्मे करतात त्यांची मिष्टान्ने मला खाऊ देऊ नकोस.
5नितीमान मनुष्य मला तडाखा मारो; ती मला दयाच होईल. तो मला दुरुस्त करो. ते माझ्या डोक्यावर तेलासारखे होईल. माझे डोके ते स्वीकारण्यास नकार देणार नाही. परंतु माझ्या प्रार्थना नेहमी दुष्ट लोकांच्या कृत्याविरूद्ध आहेत.
6त्यांच्या अधिपतींना कड्यावरून खाली लोटून दिले आहे; ते माझी वचने ऐकतील कारण ती गोड आहेत.

Read स्तोत्र. 141स्तोत्र. 141
Compare स्तोत्र. 141:1-6स्तोत्र. 141:1-6