Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 60

स्तोत्र. 60:3-12

Help us?
Click on verse(s) to share them!
3तू तुझ्या लोकांस कठीण गोष्टी दाखवल्या आहेत; तू आम्हास झिंगवण्यास लावणारा द्राक्षरस पाजला आहे.
4तुझा आदर करणाऱ्यास तू निशाण दिले आहे, यासाठी की, त्यांनी सत्याकरता तो उभारावा.
5ज्यांच्यावर तू प्रेम करतो त्यांची सुटका व्हावी, म्हणून तुझ्या उजव्या हाताने आमची सुटका कर आणि आम्हास उत्तर दे.
6देव आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला, मी जल्लोष करीन; मी शखेमाची वाटणी करीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन.
7गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे; एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे; यहूदा माझा राजदंड आहे.
8मवाब माझे धुण्याचे पात्र आहे; अदोमावर मी माझे पादत्राण फेकीन; मी आनंदाने पलिष्ट्यावर विजयाने आरोळी मारीन.
9मला बळकट नगरात कोण नेईल? मला अदोमात कोण नेईल?
10हे देवा, तू आम्हास नाकारले नाही? परंतु तू आमच्या सैन्याबरोबर लढाईत गेला नाहीस.
11तू आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत कर, कारण मनुष्याचे सहाय्य निष्फळ आहे.
12आम्ही देवाच्या मदतीने विजयी होऊ; तो आमच्या शत्रूला आपल्या पायाखाली तुडविल.

Read स्तोत्र. 60स्तोत्र. 60
Compare स्तोत्र. 60:3-12स्तोत्र. 60:3-12