Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - शास्ते

शास्ते 7

Help us?
Click on verse(s) to share them!
1मग यरूब्बाल म्हणजे गिदोन आणि त्याच्याबरोबरचे जे सर्व लोक ह्यांनी सकाळी उठून हरोदा झऱ्याजवळ तळ दिला, आणि मिद्यानी लोकांची छावणी मोरे डोंगराच्या उत्तर खोऱ्यात होती.
2तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “तुझ्याबरोबर जे सैन्य आहे ते मिद्यानावर मला विजय देण्यास फारच आहेत; अशाप्रकारे इस्राएल मजविरूद्ध अशी बढाई मारून म्हणतील की, आम्ही आमच्या सामर्थ्यानेच वाचलो.
3तर आता तू लोकांच्या कानी जाईल असे जाहीर करून सांग की, ‘जो कोणी भित्रा आणि घाबरट आहे,’ त्याने गिलाद डोंगरावरून निघून परत माघारी जावे.” तेव्हा लोकांतून बावीस हजार लोक माघारी गेले आणि दहा हजार राहिले.
4मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “अजूनही लोक फार आहेत; तू त्यांना खाली पाण्याजवळ ने, आणि तेथे मी तुझ्यासाठी त्यांची कसोटी घेईन. ज्याच्याविषयी मी तुला सांगेन, त्याने तुझ्याबरोबर यावे तो तुझ्याबरोबर जावो, आणि ज्या प्रत्येकाविषयी मी तुला सांगेन की, त्याने तुझ्याबरोबर न यावे, तो न जावो.”
5मग त्याने लोकांस खाली पाण्याजवळ नेले; मग परमेश्वराने गिदोनाला सांगितले, “जसा कुत्रा चाटून पाणी पितो, तसा जो कोणी आपल्या जिभेने चाटून पाणी पिईल त्यास तू एकीकडे ठेव; आणि जो कोणी पाणी पिण्यास आपल्या गुडघ्यावर टेकेल त्यास एकीकडे ठेव.”
6तेव्हा जे आपला हात आपल्या तोंडाकडे नेऊन चाटीत प्याले, ते पुरुष मोजले, ते तीनशे होते, आणि बाकीचे सर्व लोक पाणी प्यावयास आपल्या गुडघ्यावर टेकले.
7नंतर परमेश्वराने गिदोनाला सांगितले, “जे तीनशे पुरुष पाणी चाटून प्याले त्यांच्याकडून मी तुम्हाला सोडवीन, आणि मिद्यानाला तुझ्या हाती देईन; यास्तव बाकीच्या सर्व लोकांस आपल्या ठिकाणी जाऊ दे.”
8तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या हाती अन्नसामग्री व त्यांची रणशिंगे घेतली, आणि त्याने इस्राएलाची बाकीची सर्व माणसे त्यांच्या तंबूकडे पाठवली; केवळ ती तीनशे माणसे ठेवली. तेव्हा मिद्यान्यांचा तळ त्यांच्या खाली खिंडीत होता.
9आणि त्या रात्री असे झाले की परमेश्वराने त्यास सांगितले, “तू उठून खाली तळावर जा, कारण मी तो तुझ्या हाती दिला आहे.
10आणि जर तुला खाली जायला भीती वाटत असली तर आपला सेवक पुरा यालाबरोबर घेऊन खाली तळाजवळ जा.
11आणि ते जे बोलतील, ते तू ऐक; म्हणजे तुझे हात बळकट होतील आणि तू उतरून तळावर जाशील. तेव्हा तळात जे हत्यारबंद होते,” त्यांच्या काठापर्यंत तो आपला सेवक पुरा याला घेऊन खाली गेला.
12तेव्हा मिद्यानी व अमालेकी व पूर्वेकडल्या सर्व प्रजा खिंडीत टोळाच्या दाट थव्याप्रमाणे पसरल्या होत्या, आणि त्यांचे उंट मोजता येणार नाही इतके जास्त होते; ते संख्येने समुद्राच्या काठावरल्या वाळूच्या कणांप्रमाणे असंख्य होते.
13मग गिदोन गेला आणि पाहा, कोणी आपल्या सोबत्याला असे स्वप्न सांगत होता की, “पाहा, मी एक स्वप्न पाहिले, सातूची गोल भाकर मिद्यानी तळात घरंगळत येऊन एका तंबूपर्यंत आली आणि तिने असा जोराचा धक्का दिला की, तो तंबू पडला आणि उलटून भुई सपाट झाला.”
14तेव्हा त्याच्या सोबत्याने उत्तर दिले की, “इस्राएली मनुष्य योवाशाचा पुत्र गिदोन याची ही तलवार! तिच्याशिवाय हे दुसरे काही नाही; देवाने मिद्यान व सर्व तळ त्याच्या हाती दिला आहे.”
15तेव्हा असे झाले की गिदोनाने ते स्वप्न व त्याचा अर्थ ऐकल्यावर नमन करून प्रार्थना केली; मग तो इस्राएली तळावर माघारी येऊन बोलला, “तुम्ही उठा, कारण की परमेश्वराने मिद्यानी तळ तुमच्या हाती दिला आहे.”
16तेव्हा त्याने त्या तीनशे मनुष्यांच्या विभागून तीन टोळ्या केल्या, आणि त्यांना सर्व कर्णे दिले आणि रिकामे मडके देऊन त्या मडक्यांमध्ये दिवे दिले होते.
17तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “तुम्ही माझ्याकडे पाहा आणि मी करतो तसे करा; आता पाहा, मी छावणीच्या काठी जातो, जसे मी करतो तसे तुम्ही करा.
18म्हणजे जेव्हा मी कर्णा वाजवीन, तेव्हा, मी आणि माझ्याबरोबर असणारे सर्व संपूर्ण छावणीच्या चहुकडे कर्णे वाजवीत म्हणा, परमेश्वरासाठी व गिदोनासाठी.”

19तेव्हा गिदोन व त्याच्याबरोबर असणारे जे शंभर माणसे, ती मध्य प्रहराच्या आरंभी, नुकतेच मिद्यानी पहारेकरी बदली करत होते तेव्हा, छावणीच्या कडेला गेले; मग त्यांनी कर्णे वाजवले, आणि आपल्या हातातली मडकी फोडली.
20असे त्या तिन्ही टोळ्यांनी कर्णे वाजवले, आणि मडकी फोडली; “मग दिवे आपल्या डाव्या हाती आणि वाजवायचे कर्णे आपल्या उजव्या हाती धरले, आणि परमेश्वराची तलवार व गिदोनाची तलवार, अशी गर्जना केली.”
21तेव्हा ते छावणीच्या चोहोकडून आपापल्या ठिकाणी उभे राहिले; आणि छावणीतल्या सर्व मिद्यानी लोकांनी पलायन केले. ते मोठ्याने आरोळी मारीत दूर पळाले.
22ती तीनशे माणसे तर कर्णे वाजवीत होती, या प्रकारे परमेश्वराने मिद्यानांच्या छावणीत प्रत्येकाची तलवार त्याच्या आपापल्या साथीदारावर आणि सैन्याच्या विरूद्ध चालवली; आणि सरेरा येथल्या बेथ-शिट्टा तेथपर्यंत, आणि आबेल-महोलाच्या सीमेपर्यंत टब्बाथास सैन्य पळून गेले.
23मग नफताली, व आशेर, व मनश्शे यांतली इस्राएली माणसे एकत्रित येऊन त्यांनी मिद्यान्यांचा पाठलाग केला.
24गिदोनाने एफ्राईमाच्या सर्व डोंगराळ प्रदेशात जासूद पाठवून सांगितले की, “तुम्ही खाली जाऊन बेथ-बारापर्यंत यार्देन नदीवर नियंत्रण मिळवा आणि मिद्यानी लोकांस आडवा.” म्हणून एफ्राईमाचे सर्व लोक एकत्र आले आणि त्यांनी बेथ-बारापर्यंत यार्देन नदी पार करण्याच्या सर्व वाटा रोखून धरल्या.
25त्यांनी ओरेब व जेब हे मिद्यान्यांचे दोन सरदार पकडले. ओरेबाला त्यांनी ओरेबाच्या खडकावर ठार मारले, आणि जेबाला जेबाच्या द्राक्षकुंडात ठार मारले. त्यांनी मिद्यान्यांचा पाठलाग गेला व ओरेब व जेब ह्यांची मुंडकी यार्देनेच्या पलीकडे असलेल्या गिदोनाकडे आणली.