Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - शास्ते - शास्ते 20

शास्ते 20:3-9

Help us?
Click on verse(s) to share them!
3आता बन्यामिनी लोकांनी ऐकले की, इस्राएल लोक मिस्पात नगरात जमले आहेत. तेव्हा इस्राएलाचे लोक म्हणाले, “आम्हांला सांगा, ही वाईट गोष्ट कशी घडली?”
4तो लेवी, ज्याच्या पत्नीचा खून झाला होता तिच्या पतीने उत्तर देऊन म्हटले, “मी आणि माझी उपपत्नी बन्यामिनाच्या प्रदेशातील गिबा येथे रात्र घालवण्यासाठी येऊन उतरलो.
5गिबातल्या लोकांनी रात्री माझ्यावर हल्ला करण्यासाठी घराच्या सभोवताली वेढा दिला आणि मला मारण्याचा त्यांचा हेतू होता. त्यांनी माझ्या उपपत्नीवर बलात्कार केला आणि ती मरण पावली.
6मी आपल्या उपपत्नीला घेऊन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले, आणि ते इस्राएलाच्या वतन भागातील सर्व प्रांतांत पाठवले. कारण, त्यांनी इस्राएलात दुष्टपणा आणि बलात्कार केला आहे.
7आता तुम्ही, सर्व इस्राएली लोकांनो, बोला आणि तुमचा सल्ला द्या आणि याकडे लक्ष द्या.”
8सर्व लोक एक मन होऊन एकत्र उठले आणि ते म्हणाले, “आमच्यातला कोणीही आपल्या तंबूकडे जाणार नाही आणि कोणी आपल्या घरी परतणार नाही.
9परंतु आता आम्ही गिब्याचे हे असे करणार आहोत. आम्ही चिठ्ठ्या टाकून मार्गदर्शन घेतल्यावर हल्ला करायचे ठरवू.

Read शास्ते 20शास्ते 20
Compare शास्ते 20:3-9शास्ते 20:3-9