Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - यश.

यश. 31

Help us?
Click on verse(s) to share them!
1जे कोणी मदतीसाठी खाली मिसरमध्ये जातात आपल्या घोड्यांवर अवलंबून राहतात त्यांना हायहाय, आणि रथांवर (कारण ते पुष्कळ आहेत) आणि घोडस्वारांवर (कारण ते अगणित आहेत) भरवसा ठेवतात. परंतु ते परमेश्वराचा शोध घेत नाहीत किंवा ते इस्राएलाचा जो पवित्र त्याकडे लक्ष देत नाही!
2तोही ज्ञानी आहे आणि तो संकटे आणील व आपली वचने माघारी घेणार नाही. आणि तो दुष्टांच्या घराण्याविरूद्ध आणि जे कोणी पाप करणाऱ्यांच्या मदतीविरूद्ध उठेल.
3मिसर मनुष्य आहे देव नाही, त्यांचे घोडे मांस आहेत आत्मा नाही. जेव्हा परमेश्वर आपला हात बाहेर लांब करील, तेव्हा दोघेही त्यांना मदत करणारा अडखळेल आणि ज्याची मदत केली तो पडेल; दोघांचा नाश होईल.
4परमेश्वराने मला हे सांगितले आहे, “जसा एखादा सिंह, तरुण सिंह, आपल्या फाडलेल्या भक्ष्यावर गुरगुरतात,” जेव्हा मेंढपाळांचा गट बोलावून त्यांच्याविरुद्ध आणला असताही, त्यांच्या आवाजाने भयभीत होत नाही, किंवा त्यांच्या गोंगाटाने दबकत नाहीत; तसा सेनाधीश परमेश्वर सियोन पर्वतावर, त्याच्या टेकडीवर लढाई करण्यास उतरेल.
5ज्याप्रमाणे पक्षी घिरट्या घालतो तसा सेनाधीश परमेश्वर यरूशलेमचे रक्षण करील; तो तिचे रक्षण करील आणि तो तिच्यावरून ओलांडून जाऊन तिला वाचवील व सुरक्षित ठेविल.
6इस्राएलाच्या लोकांनो, जे तुम्ही त्याच्यापासून तीव्रतेने दूर निघून गेलात ते तुम्ही त्याच्याकडे माघारी या.
7कारण त्या दिवशी ते प्रत्येक आपल्या पापी हातांनी तयार केलेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या मूर्तींचा त्याग करतील.
8अश्शूर तलवारीने पडेल; जी त्याचा नाश करील ती सत्ताधारी मनुष्याची तलवार नव्हे. तो तलवारीपासून पळून जाईल आणि त्यातील तरूणांना पकडून गुलाम केले जाईल.
9ते त्यांचा सर्व आत्मविश्वास भयामुळे गमावून बसतील, आणि त्यांचे सरदार परमेश्वराचा युद्धाचा झेंडा बघून घाबरतील ज्याचा अग्नी सियोनेत आहे आणि परमेश्वराची भट्टी यरूशलेमेत आहे, त्या परमेश्वराची ही घोषणा आहे.