Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - यश.

यश. 17

Help us?
Click on verse(s) to share them!
1दिमिष्काविषयीची घोषणा. पाहा, दिमिष्क हे एक नगर म्हणून राहणार नाही; ते नासाडीचा ढीग होईल.
2अरोएराची नगरे पूर्ण सोडून जातील. ती कळपासाठी पहुडण्याची जागा होईल आणि त्यांना कोणी घाबरवणार नाही.
3एफ्राइमापासून तटबंदीची नगरे नाहीशी होतील. दिमिष्कापासून त्याचे राज्य आणि अरामाचा अवशेष ही नाहीसे होतील, ही इस्राएल लोकांच्या गौरवासारखी होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
4त्या दिवसात असे होईल की, याकोबाचे वैभव विरळ होईल आणि त्याचा पुष्ट देह सडपातळ होईल.
5जेव्हा जसे कापणी करणारा उभे धान्य गोळा करताना आणि त्याच्या हाताने कणसे कापतो तसे होईल. जसे रेफाईमांच्या खोऱ्यात कोणी कणसे टिपतो तसे होईल.
6जसे जेव्हा जैतून झाड हलविले असता त्यावर काही फळे शिल्लक राहतात, दोन किंवा तीन फळे सर्वाहून उंच शेंड्यावर राहतात, चार किंवा पाच त्याच्या उंचावरच्या फलदायी फांद्यावर राहतात, असे परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो.
7त्या दिवशी लोक आपल्या उत्पन्नकर्त्याकडे पाहतील आणि त्यांचे डोळे इस्राएलाच्या एका पवित्र प्रभूकडे लागतील.
8आपल्या हातांच्या कामाकडे, ते वेद्यांकडे पाहणार नाहीत किंवा आपल्या बोटांनी केलेल्या अशेरा स्तंभ आणि सूर्यमूर्ती याकडे ते पाहणार नाहीत.
9त्या दिवसात त्यांची बळकट नगरे डोंगराच्या माथ्यावरील वनराईच्या उतारावर सोडलेल्या ठिकाणांसारखी, जी ठिकाणे इस्राएल लोकांच्यामुळे त्यांनी सोडली होती त्यासारखी होतील, आणि तेथे ती ओस पडतील.
10कारण तू आपल्या तारणकर्त्या देवाला विसरलास आणि आपल्या सामर्थ्याच्या खडकाकडे दुर्लक्ष केले. यामुळे तू रम्य रोपे लावली आणि निसटून अपरीचीत प्रवासास निघाला.
11त्या दिवशी तू लाविले आणि कुंपण घातले व मशागत केली. लवकरच तुझे बीज वाढले, परंतु त्याचा हंगाम दुःखाच्या व भारी शोकाच्या दिवशी अयशस्वी होईल.
12समुद्राच्या गर्जनेप्रमाणे गर्जना करणारा पुष्कळ लोकांचा समुदाय आणि महापुराच्या जलांच्या गोंगाटासारखी गोंगाट करणारी राष्ट्रांची गर्दी यांना हायहाय!
13राष्ट्रे महापुराच्या बहुत जलांच्या गोंगाटाप्रमाणे गोंगाट करतील, परंतु देव त्यांना धमकावील तेव्हा ते दूर पळतील आणि वाऱ्यापुढे डोंगरावरच्या भुसासारखे व वादळापुढे धुळीसारखा त्यांचा पाठलाग होईल.
14तेव्हा पाहा, संध्याकाळी दहशत! आणि पहाटेपूर्वी ती नाहीशी होते; जे आम्हांला लुटतात त्यांचा हा वाटा आहे, आणि जे आम्हास लुबाडतात त्यांचा हिस्सा हाच आहे.