Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - यश.

यश. 49

Help us?
Click on verse(s) to share them!
1अहो द्विपांनो, माझे ऐका! आणि दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनो, लक्ष द्या. माझ्या आईने मला जगात आणले असताच, मी जन्मताच परमेश्वराने मला बोलावले आहे.
2त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारी सारखे केले आहे, त्याने मला त्याच्या हाताच्या सावलीत लपवले आहे. त्याने मला उजळता बाण केले आहे आणि आपल्या भात्यात मला लपवून ठेवले आहे.
3तो मला म्हणाला, “तू माझा सेवक इस्राएल आहेस, ज्याच्या ठायी मी माझा महिमा प्रकट करीन.”
4पण मी म्हणालो मी निरर्थक मेहनत केली, मी माझी शक्ती व्यर्थ घालवली आहे. तथापि माझा न्याय परमेश्वराजवळ आणि माझे प्रतिफळ माझ्या देवाजवळ आहे.
5आणि आता, तो परमेश्वर म्हणतो, ज्याने मला त्याचा सेवक व्हावा म्हणून जन्मापासून घडवले आहे, ह्यासाठी की याकोबाला त्याच्याजवळ परत आणावे, मी परमेश्वराच्या दृष्टीत सन्मान पावलो आहे, आणि माझा देव माझे बळ झाले आहे.
6तो म्हणतो, “याकोबाचे वंश उभारायला व इस्राएलचे वाचलेले परत आणण्यासाठी तू माझा सेवक व्हावे ही फार लहान गोष्ट आहे. तू पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे तारण व्हावे म्हणून मी तुला राष्ट्रांना प्रकाश असा देतो.”
7मनुष्यांनी ज्याला तुच्छ मानले, राष्ट्रांनी ज्याला वीट मानले, अधिकाऱ्यांच्या सेवकाला इस्राएलचा खंडणारा, त्याचा पवित्र देव असे म्हणतो, परमेश्वर जो विश्वासू, इस्राएलाला पवित्र, ज्याने तुला निवडले आहे त्याच्यामुळे राजे तुला पाहून उठतील आणि अधिकारी नमन करतील.
8परमेश्वर असे म्हणतो, योग्य वेळेला मी माझी दया दाखवीन, मी तुला उत्तर देईल, आणि तारणाच्या दिवशी मी तुला मदत करेन. मी तुझे रक्षण करेन आणि तुला लोकांचा करार असा देईन. देश पुन्हा बांधायला आणि ओसाड वतन करून घ्यायला,
9तू कैद्यांना बाहेर येण्यास सांगशील. अंधारात राहणाऱ्या लोकांस तू म्हणशील अंधारातून बाहेर या व तुम्ही आपणास प्रकट करा. ते मार्गात चरतील आणि सर्व उघड्या टेकड्या त्यांची कुरणे होतील.
10त्यांना भूक व तहान लागणार नाही, तळपणारा सूर्य आणि उष्णता त्यांना इजा करणार नाहीत. कारण जो त्यांच्यावर दया करतो, तो त्यांना घेऊन चालेल. तो त्यांना पाण्याच्या झऱ्याजवळ घेऊन जाईल.
11मी माझे डोंगर सपाट करीन आणि खोलगट रस्त्यावर भर घालून ते उंच करीन.
12“पाहा! दूरदूरच्या ठिकाणाहून ते माझ्याकडे येत आहेत उत्तर आणि पश्चिम दिशांकडून ते माझ्याकडे येत आहेत. काही सीनी येत आहेत.”
13हे स्वर्गांनो गायन करा, हे पृथ्वी, आनंदीत हो, डोंगरांनो, आनंदाचा कल्लोळ करा. कारण परमेश्वराने त्याच्या लोकांचे सांत्वन केले आहे, आणि तो आपल्या दु:खीतांवर दया करील.
14पण आता सियोन म्हणते, “परमेश्वराने मला सोडून दिले, माझा प्रभू मला विसरला.”
15कोणी स्त्री तिने जन्म दिलेल्या, आपल्या दुध पित्या बाळाला दया न दाखवता विसरेल काय? होय, कदाचित ती विसरेल पण मी तुला विसरणार नाही.
16पाहा! तुझे नाव मी माझ्या तळहातावर कोरले आहे. तुझे कोट नित्य माझ्या पुढे आहेत.
17तुझी मुले त्वरा करीत आहेत, ज्यांनी तुझा नाश केला आहे, ते दूर जात आहेत.
18तू आपल्या सभोवती नजर टाक आणि पाहा, ते सर्व एकत्र गोळा होऊन, तुझ्या कडे येतील. परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे, खचित तू त्यांना दागिण्यांप्रमाणे आपल्या वर घालशील, एका नवरी सारखे तू त्यांना आपणावर घालशील.

19जरी तू कचरा आणि उजाड अशी होती, आणि उध्वस्त झाली होती. तर आता राहाणाऱ्यांस फार संकुचित होशील आणि जे तुला गिळत असत ते फार दूर होतील.
20वियोग समयी तुझ्यापासून दूर झालेली मुले तुझ्या कानात म्हणतील. “ही जागा फारच लहान आहे. आम्हास राहायला मोठी जागा कर, जेणेकरून आम्ही त्यामध्ये राहू.”
21मग तू मनाशी म्हणशील, मी मुलांवेगळी झालेली, वांझ, हद्दपार झालेली व इकडे तिकडे भटकणारी अशी असता, माझ्यासाठी या मुलांना कोणी जन्म दिला?
22परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणतो, “बघ, मी हात उंचावून राष्ट्रांना खूण करीन. मी सर्व लोकांस दिसावा म्हणून माझा ध्वज उंच धरीन, तेव्हा ते तुझी मुले त्यांच्या हातात आणि तुझ्या मुलींना खांद्यांवरून तुझ्याकडे आणतील.
23राजे तुझे संगोपण करणारे बाप होतील, आणि त्यांच्या राण्या तुझ्या दाया होतील. ते भूमीकडे तोंड लववून, तुझ्यापुढे वाकून तुला नमन करतील आणि ते तुझ्या पायाची धूळ चाटतील, आणि मग तुला कळेल की मीच परमेश्वर आहे, जे माझ्यावर विश्वास ठेवतात ते लाजवले जाणार नाहीत.”
24वीर योद्धा पासून लूट हिसकून घेतील काय? अथलाल जूलमी राजाकडे कायद्याने बंदी असलेले सोडले जातील काय?
25पण परमेश्वर असे म्हणतो, होय, बंदिवान योद्धांकडून काढून घेण्यात येतील, आणि लूटलेले सोडवले जातील. कारण मी तुझ्या शत्रूंचा विरोध करीन, आणि तुझ्या मुलांना वाचविल.
26“मी तुझ्या पीडणाऱ्यांना त्यांचेच मांस खायला लावीन, आणि जसे नव्या द्राक्षरसाने तसे ते स्वत:च्याच रक्ताने मद्यधुंद होतील. आणि सर्व मनुष्य जाणतील की, मी परमेश्वर, तुझा तारणारा आहे, आणि याकोबाचा समर्थ तुझा खंडणारा आहे.”