Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 39

स्तोत्र. 39:5-12

Help us?
Click on verse(s) to share them!
5पाहा, तू माझे दिवस हाताच्या रुंदी इतके केले आहेत. आणि माझा जीवनकाल तुझ्यासमोर काहीच नाही. खचित मनुष्य केवळ एक श्वासच आहे.
6खचित प्रत्येक मनुष्य हा सावलीसारखा चालतो, खचित प्रत्येकजण संपत्ती साठवण्यासाठी घाई करतो, पण त्यांना हे कळत नाही कोणास ते प्राप्त होणार.
7हे प्रभू, आता मी कशाची वाट पाहू? तूच माझी एक आशा आहेस!
8माझ्या अपराधांवर मला विजय दे, मला मूर्खांच्या अपमानाची वस्तू होऊ देऊ नको.
9मी मुका राहिलो, मी आपले तोंड उघडले नाही. कारण हे तुच केले आहेस.
10मला जखमा करणे थांबव, तुझ्या हाताच्या माराने मी क्षीण झालो आहे.
11जेव्हा तू लोकांस पापांबद्दल शिकवण करतोस. कसरीप्रमाणे तू त्यांची शक्ती खाऊन टाकतो. खचित सर्व मनुष्य फक्त वाफ आहेत. (सेला)
12परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक, माझ्याकडे कान लाव. माझे रडणे ऐक, कारण तुझ्याजवळ परका, माझ्या पूर्वजांसारखा उपरी आहे.

Read स्तोत्र. 39स्तोत्र. 39
Compare स्तोत्र. 39:5-12स्तोत्र. 39:5-12