Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 39:5-12 in Marathi

Help us?

स्तोत्र. 39:5-12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 पाहा, तू माझे दिवस हाताच्या रुंदी इतके केले आहेत. आणि माझा जीवनकाल तुझ्यासमोर काहीच नाही. खचित मनुष्य केवळ एक श्वासच आहे.
6 खचित प्रत्येक मनुष्य हा सावलीसारखा चालतो, खचित प्रत्येकजण संपत्ती साठवण्यासाठी घाई करतो, पण त्यांना हे कळत नाही कोणास ते प्राप्त होणार.
7 हे प्रभू, आता मी कशाची वाट पाहू? तूच माझी एक आशा आहेस!
8 माझ्या अपराधांवर मला विजय दे, मला मूर्खांच्या अपमानाची वस्तू होऊ देऊ नको.
9 मी मुका राहिलो, मी आपले तोंड उघडले नाही. कारण हे तुच केले आहेस.
10 मला जखमा करणे थांबव, तुझ्या हाताच्या माराने मी क्षीण झालो आहे.
11 जेव्हा तू लोकांस पापांबद्दल शिकवण करतोस. कसरीप्रमाणे तू त्यांची शक्ती खाऊन टाकतो. खचित सर्व मनुष्य फक्त वाफ आहेत. (सेला)
12 परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक, माझ्याकडे कान लाव. माझे रडणे ऐक, कारण तुझ्याजवळ परका, माझ्या पूर्वजांसारखा उपरी आहे.
स्तोत्र. 39 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी