Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 88

स्तोत्र. 88:5-16

Help us?
Click on verse(s) to share them!
5मला मृतामध्ये सोडून दिले आहे; अशा मृतासारखा जो कबरेत पडून राहतो, ज्याची तू आणखी दखल घेत नाहीस, ज्याला तुझ्या सामर्थ्यापासून कापून टाकले आहेत, त्यांच्यासारखा मी झालो आहे.
6तू मला त्या खड्‌यांतल्या खालच्या भागात, काळोखात व अगदी खोल जागी टाकले आहेस.
7तुझ्या क्रोधाचे खूप ओझे माझ्यावर पडले आहे, आणि तुझ्या सर्व लाटा माझ्यावर जोराने आपटत आहेत.
8तुझ्यामुळे माझ्या ओळखीचे मला टाळतात. त्यांच्या दृष्टीने माझा त्यांना वीट येईल असे तू केले आहे; मी आत कोंडलेला आहे आणि मी निसटू शकत नाही.
9कष्टामुळे माझे डोळे थकून जात आहेत; हे परमेश्वरा, मी दिवसभर तुला आरोळी मारित आहे. मी आपले हात तुझ्यापुढे पसरत आहे.
10तू मृतांसाठी चमत्कार करशील काय? जे मरण पावलेले आहेत ते उठून तुझी स्तुती करतील काय?
11तुझ्या दयेची व प्रामाणिकपणाची कबरेत किंवा मृतांच्या जागी घोषणा होईल का?
12तुझ्या विस्मयकारक कृतीचे अंधारात किंवा विस्मरणलोकी तुझे नितीमत्व कळेल काय?
13परंतु हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; सकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते.
14हे परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास? तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस?
15मी नेहमीच पीडित असून माझ्या तरुणपणापासूनच मरणोन्मुख झालो आहे; मी तुझ्या दहशतीने व्यथित झालो आहे; मी काहीच करू शकत नाही.
16तुझा संतप्त क्रोध माझ्यावरून चालला आहे, आणि तुझ्या घाबरून सोडणाऱ्या कृत्यांनी माझा संपूर्ण नाश केला आहे.

Read स्तोत्र. 88स्तोत्र. 88
Compare स्तोत्र. 88:5-16स्तोत्र. 88:5-16