2तुझ्या लोकांचा नीतीने न्याय करो, आणि तुझ्या गरीब लोकांचा न्यायनिवाडा न्यायाने करो.
3पर्वत लोकांसाठी शांती उत्पन्न करतील; टेकड्या न्यायीपणा उत्पन्न करतील.
4तो लोकांतील गरीबांचा न्याय करील; गरजवंताच्या मुलांना तारील, आणि जुलूम करणाऱ्यांचे तुकडे करील.
5जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत सर्व पिढ्यानपिढ्या ते तुझा आदर करतील.
6जसा कापलेल्या गवतावर पाऊस पडतो, तशी पृथ्वीला भिजवणारी पावसाची सर उतरून येईल.
7त्याच्या दिवसात नितिमानाची भरभराट होवो, आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती होईल.
8समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि त्या नदीपासून ते पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याची सत्ता राहो.
9अरण्यात राहणारे त्याच्यासमोर नमन करोत; त्याचे शत्रू धूळ चाटोत.
10तार्शीश आणि बेटांचे राजे खंडणी देवोत; शबा आणि सबाच्या राजांना त्याच्यासाठी भेटी आणोत.
11खरोखर, सर्व राजे त्याच्यापुढे नमन करोत; सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत;
12कारण त्याने धावा करणाऱ्या गरजवंताला, आणि गरीबाला दुसरा कोणी मदतनीस नाही त्यास मदत केली आहे.
13तो गरीब आणि गरजवंतांवर दया करील, आणि गरजवंताचा जीव तो तारील.