2परमेश्वर यरूशलेम पुन्हा बांधतो; तो इस्राएलाच्या विखुरलेल्या लोकांस एकत्र करतो.
3तो भग्नहृदयी जनांना बरे करतो, आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो.
4तो ताऱ्यांची मोजणी करतो; तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो.
5आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे; त्याची बुद्धी मोजू शकत नाही.
6परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो; तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो.
7गाणे गाऊन परमेश्वराची उपकारस्तुती करा. वीणेवर आमच्या देवाचे स्तुतीगान करा.
8तो ढगांनी आकाश झाकून टाकतो, आणि पृथ्वीसाठी पाऊस तयार करतो, तो डोंगरावर गवत उगवतो.
9तो प्राण्यांना आणि जेव्हा कावळ्यांची पिल्ले कावकाव करतात त्यांना अन्न देतो.
10घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही; मनुष्याच्या शक्तीमान पायांत तो आनंद मानत नाही.
11जे परमेश्वराचा आदर करतात, जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो.
12हे यरूशलेमे, परमेश्वराची स्तुती कर; हे सियोने तू आपल्या देवाची स्तुती कर.
13कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत; त्याने तुझ्यामध्ये तुझी लेकरे आशीर्वादित केली आहेत.
14तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो; तो तुला उत्कृष्ट गव्हाने तृप्त करतो.
15तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो.