Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - शास्ते - शास्ते 20

शास्ते 20:18-39

Help us?
Click on verse(s) to share them!
18मग इस्राएल लोक उठून बेथेलापर्यंत गेले, आणि त्यांनी देवापासून सल्ला विचारला. त्यांनी विचारले, “बन्यामिनी लोकांशी लढायला आमच्यातून पहिल्याने कोणी जावे?” परमेश्वर देवाने सांगितले, “यहूदाने पहिल्याने जावे.”
19इस्राएली लोक सकाळी उठले आणि त्यांनी गिब्यासमोर लढाईची तयारी केली.
20मग इस्राएली सैन्य बन्यामिन्यांविरुद्ध लढायला बाहेर गेले, त्यांनी त्यांच्या विरुद्ध गिबा या ठिकाणी लढाईची व्यूहरचना केली.
21तेव्हा बन्यामिनी सैन्याने गिब्यातून निघून आणि त्या दिवशी इस्राएली सैन्यातील बावीस हजार मनुष्यांना मारले.
22तथापि इस्राएली सैन्याने पुन्हा शक्तीशाली होऊन जेथे त्यांनी पहिल्या दिवशी लढाई लावली होती, त्या ठिकाणीच व्यूहरचना केली.
23आणि इस्राएली लोक वर गेले आणि परमेश्वरासमोर संध्याकाळपर्यंत रडले. आणि त्यांनी परमेश्वरास विचारले, “आमचा बंधू बन्यामीन याच्या लोकांशी लढण्यास मी पुन्हा जावे काय?” परमेश्वर म्हणाला, “त्यांच्यावर हल्ला करा.”
24म्हणून दुसऱ्या दिवशी इस्राएली सैन्य बन्यामिनी सैन्याविरुद्ध चालून गेले.
25दुसऱ्या दिवशी, बन्यामिनी लोक गिब्यातून त्यांच्याविरुद्ध बाहेर आले, आणि त्यांनी इस्राएली सैन्यातील अठरा हजार मनुष्यांना मारले, हे सर्व तलवारीने लढाईचे शिक्षण घेतलेले होते.
26नंतर सर्व इस्राएली सैन्य आणि सर्व लोक चढून बेथेल येथे गेले आणि रडले, आणि त्यांनी तेथे परमेश्वर देवासमोर बसले. त्यांनी त्या दिवशी संध्याकाळपर्यंत उपास केला, आणि परमेश्वरास होमार्पण व शांत्यर्पणे अर्पण केले.
27आणि इस्राएली लोकांनी परमेश्वर देवाला विचारले, कारण त्या दिवसात देवाच्या कराराचा कोश तेथे होता.
28आणि अहरोनाचा पुत्र एलाजार याचा पुत्र फिनहास त्या दिवसात त्याची सेवा करत होता. “आम्ही आपला बंधू बन्यामीन याच्या लोकांविरुद्ध लढण्यास परत जावे काय किंवा थांबावे?” तेव्हा परमेश्वर देव म्हणाला, “तुम्ही चढून जा; कारण उद्या मी तुम्हाला त्यांचा पराजय करण्यास मदत करीन.”
29मग इस्राएल लोकांनी गिब्याच्या भोवताली गुप्तस्थळी माणसे ठेवली.
30मग तिसऱ्या दिवशी इस्राएली लोक बन्यामिनाच्या लोकांविरुद्ध लढले, आणि पूर्वीप्रमाणे त्यांनी गिब्याजवळ व्यूहरचना केली.
31तेव्हा बन्यामीनी लोक गेले आणि इस्राएल लोकांविरूद्ध लढले आणि त्यांना नगरापासून काढून घेऊन दूर नेण्यात आले. त्यांनी काही लोकांस मारण्यास सुरवात केली. त्यातला एक रस्ता बेथेलास आणि दुसरा गिब्याकडे जातो, त्यामध्ये इस्राएलांपैकी सुमारे तीस पुरुष शेतात त्यांनी मारले;
32बन्यामिनी लोकांनी म्हटले, “त्यांचा पराजय झाला आहे, आणि पहिल्यासारखे ते आमच्यापुढून पळून जात आहेत.” परंतु इस्राएली सैन्य म्हणाले, “आपण मागे पळू आणि त्यांना नगरातल्या रस्त्या पासून दूर काढून आणू.”
33सर्व इस्राएली सैन्य त्यांच्या जागेवरून उठले आणि त्यांनी बआल-तामार येथे लढाईसाठी व्यूहरचना केली. नंतर जे इस्राएली सैन्य गुप्तस्थळीं लपून बसले होते ते आपल्या जागेवरून, मारे गिबा येथून अचानक उठले.
34सर्व इस्राएलातले निवडलेले दहा हजार पुरुष गिब्यापुढे आले आणि भयंकर लढाई झाली, तथापि बन्यामिन्यांना समजले नव्हते की, आपत्ती आपल्याजवळ येऊन ठेपली आहे.
35तेव्हा परमेश्वर देवाने बन्यामिनाला इस्राएलापुढे पराजित केले. त्या दिवशी बन्यामिन्यांचे पंचवीस हजार शंभर पुरुष मारले गेले. त्या सर्वांना तलवारीने लढण्याचे शिक्षण देण्यात आले होते.
36बन्यामिनी लोकांनी पाहिले की आपण पराजित झालो आहोत. हे असे झाले की इस्राएली मनुष्यांनी गिब्यावर जे दबा धरून ठेवले होते, त्यांचा भरवसा धरला म्हणून ती बन्यामिनी मनुष्यांपुढून बाजूला झाली.
37नंतर दबा धरून बसणारे उठले आणि पटकन ते गिब्यात गेले आणि त्यांनी त्यांच्या तलवारीने नगरात राहणाऱ्या प्रत्येकाला ठार मारले.
38आता दबा धरणारे आणि इस्राएली सैन्यात सांकेतिक खूण ठरली होती की त्यांनी नगरातून उंच धुराचा उंच लोळ चढवावा.
39आणि इस्राएली सैन्य लढाईत मागे फिरू लागले; आता बन्यामिन्याने हल्ल्याला सुरवात केली आणि इस्राएलांतली सुमारे तीस माणसे मारली. आणि त्यांनी म्हटले, “खात्रीने पाहिल्या लढाईसारखे ते आमच्यापुढे पराजित झालेत.”

Read शास्ते 20शास्ते 20
Compare शास्ते 20:18-39शास्ते 20:18-39