Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 10

लेवी. 10:5-13

Help us?
Click on verse(s) to share them!
5तेव्हा मोशेने सांगितल्याप्रमाणे मिशाएल व एलसाफान यांनी त्यांना उचलून छावणीबाहेर नेले; त्यावेळी परमेश्वराची सेवा करताना घालावयाचे विणलेले विशेष अंगरखे नादाब व अबीहू ह्यांच्या अंगात अद्याप तसेच होते.
6मोशेने अहरोन व त्याचे पुत्र एलाजार व इथामार यांना सांगितले, “तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू नका तर ते विंचरा, आणि तुमची वस्त्रे फाडू नका! तुमचे दु:ख दाखवू नका! म्हणजे मग तुम्ही मारले जाणार नाही आणि परमेश्वराचा राग सर्व मंडळीवर भडकणार नाही; सर्व इस्राएल घराणे तुमचे बांधव आहेत; नादाब व अबीहू ह्याना परमेश्वराने अग्नीने भस्म केल्याबद्दल त्यांनी शोक करावा;
7पण तुम्ही दर्शनमंडपाच्या बाहेर जाऊ नये; जर बाहेर जाल तर मराल! कारण परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे.” तेव्हा अहरोन, एलाजार व इथामार ह्यांनी मोशेची आज्ञा मानली.
8मग परमेश्वर अहरोनाला म्हणाला,
9“जेव्हा तू व तुझे पुत्र तुम्ही दर्शनमंडपामध्ये जाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल! हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढया कायमचा विधि आहे.
10तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने पवित्र व सामान्य तसेच शुद्ध व अशुद्ध ह्यामधील भेद जाणावा;
11याप्रकारे परमेश्वराने मोशेद्वारे नेमून दिलेले सर्व विधीनियम अहरोनाने सर्व इस्राएल लोकांस शिकवावे.”
12मग मोशे अहरोनाला आणि एलाजार व इथामार या हयात असलेल्या त्याच्या मुलांना म्हणाला, परमेश्वराच्या अर्पणापैकी उरलेले अन्नार्पण घ्या व ते वेदीपाशी खमीराशिवाय खा, कारण ते परमपवित्र आहे;
13परमेश्वरासाठी अर्पिलेल्या अर्पणाचा तो भाग आहे आणि मी दिलेल्या विधीनियमांच्या शिकवणुकीप्रमाणे तो भाग तुझा व तुझ्या मुलांच्या हक्काचा आहे; परंतु तो तुम्ही पवित्र जागी खावा.

Read लेवी. 10लेवी. 10
Compare लेवी. 10:5-13लेवी. 10:5-13