Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लूक - लूक 22

लूक 22:47-69

Help us?
Click on verse(s) to share them!
47तो बोलत असतांनाच लोकांचा जमाव आला व बारा शिष्यातील यहूदा इस्कर्योत म्हटलेला एकजण त्यांच्यापुढे चालत होता. येशूचे चुंबन घेण्यासाठी तो त्याच्याजवळ आला.
48परंतु येशू त्यास म्हणाला, “यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राचा विश्वासघात करतोस काय?”
49त्याच्याभोवती जे होते ते काय होणार हे ओळखून त्यास म्हणाले, “प्रभू, आम्ही तलवार चालवावी काय?”
50त्यांच्यापैकी एकाने महायाजकाच्या नोकरावर वार केला आणि त्याचा उजवा कान कापला.
51येशूने उत्तर दिले, “हे पुरेसे असू द्या.” आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श केला व त्यास बरे केले.
52नंतर येशू मुख्य याजक लोक, परमेश्वराच्या भवनाचे मुख्य अधिकारी आणि वडील जे त्याच्यावर चालून आले होते, त्यांना म्हणाला, “तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन माझ्यावर चालून आलात, जसा काय मी लुटारु आहे.
53मी तर तुम्हाबरोबर दररोज परमेश्वराच्या भवनात असे आणि तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही. परंतु ही तुमची वेळ आणि अंधाराची सत्ता आहे.”
54त्यांनी त्यास अटक केली व ते त्यास महायाजकाच्या घरी घेऊन गेले. पेत्र दुरून त्यांच्यामागे चालला.
55त्यांनी अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटविला आणि त्याच्याभोवती बसले व पेत्रही त्यांच्यात बसला.
56तेव्हा कोणाएका दासीने तेथे त्यास विस्तवाच्या उजेडात बसलेले पाहिले. तिने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि ती म्हणाली, “हा मनुष्यही त्याच्याबरोबर होता.”
57पेत्र ते नाकारुन म्हणाला, “बाई, मी त्यास ओळखत नाही.”
58थोड्या वेळानंतर दुसऱ्या मनुष्याने त्यास पाहिले आणि म्हणाला, “तू सुद्धा त्यांच्यापैकी एक आहेस!” पण पेत्र म्हणाला, “गृहस्था, मी नाही!”
59नंतर सुमारे एक तास झाल्यावर आणखी एकजण ठामपणे म्हणाला, “खात्रीने हा मनुष्यसुद्धा त्याच्याबरोबर होता, कारण हा गालील प्रांताचा आहे.”
60परंतु पेत्र म्हणाला, “गृहस्था तू काय बोलतोस ते मला कळत नाही!” तो बोलत असतांना त्याच क्षणी कोंबडा आरवला.
61आणि प्रभूने वळून पेत्राकडे पाहिले तेव्हा पेत्राला प्रभूने उच्चारिलेले वाक्य आठवले, “आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,” असे सांगितलेले त्यास आठवले.
62मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.
63येशूवर पहारा देणाऱ्या लोकांनी त्याचा उपहास करायला व त्यास मारायला सुरुवात केली.
64त्यांनी त्याचे डोळे बांधले व त्यास प्रश्न विचारु लागले. ते म्हणाले, “ओळख बघू! तुला कोणी मारले?”
65आणि ते त्याची निंदा करण्यासाठी आणखी पुष्कळ काही बोलले.
66दिवस उगवला तेव्हा वडील लोकांची म्हणजे त्यामध्ये दोन्ही प्रकारचे लोक, मुख्य याजक लोक व नियमशास्त्राचे शिक्षक यांची सभा भरली आणि ते त्यास त्यांच्या सभेत घेऊन गेले.
67ते म्हणाले, “जर तू ख्रिस्त आहेस तर आम्हास सांग” येशू त्यांना म्हणाला, जरी “मी तुम्हास सांगितले तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही.
68आणि जरी मी तुम्हास प्रश्न विचारला तरी तुम्ही उत्तर देणार नाही.
69पण आतापासून मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेला असेल.”

Read लूक 22लूक 22
Compare लूक 22:47-69लूक 22:47-69