Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - 2 राजे - 2 राजे 10

2 राजे 10:29-35

Help us?
Click on verse(s) to share them!
29पण नबाटचा मुलगा यराबाम याने जी पापे इस्राएलाला करायला लावली त्यापासून येहू पूर्णपणे परावृत्त झाला नाही. बेथेल आणि दान इथली सोन्याची वासरे त्याने उध्वस्त केली नाहीत.
30परमेश्वर येहूला म्हणाला, “तू चांगली कामगिरी केलीस. माझ्या मते जे उचित तसेच तू वागलास. अहाबाच्या कुटुंबाचा मला हव्या त्या पध्दतीने तू विध्वंस केलास. तेव्हा आता तुझ्या पुढच्या चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील.
31पण परमेश्वराच्या नियमांना अनुसरुन मन:पूर्वक वर्तन ठेवणे येहूला जमले नाही. यराबामाच्या ज्या दुष्कृत्यांमुळे इस्राएल पापाच्या गर्तेत गेला ते करण्यापासून तो स्वत:ला थोपवू शकला नाही.”
32याचवेळी परमेश्वराने इस्राएल प्रदेशाचे लचके तोडायला सुरुवात केली. अरामाचा राजा हजाएल याने इस्राएलच्या सर्व सीमांवर पराभव केला.
33यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेश त्याने जिंकला गाद, रऊबेन आणि मनश्शे यांच्या कुटुंबांच्या ताब्यातील प्रदेशासकट सगळा गिलाद त्यामध्ये आला. तसेच आर्णोन खोऱ्यातील अरोएर पासून गिलाद आणि बाशानपर्यंतचा प्रदेश हजाएलने जिंकला.
34“इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात येहूच्या इतर पराक्रमांची नोंद आहे.
35येहू मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दफन शोमरोनात केले. येहूचा मुलगा यहोआहाज त्यानंतर इस्राएलचा राजा झाला.

Read 2 राजे 102 राजे 10
Compare 2 राजे 10:29-352 राजे 10:29-35