Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - 1 राजे - 1 राजे 22

1 राजे 22:44-52

Help us?
Click on verse(s) to share them!
44यहोशाफाट राजाने इस्राएलाच्या राजाशी शांततेचा करार केला.
45राजा यहोशाफाट शूर होता. त्याने बऱ्याच लढाया केल्या. त्याने जे केले त्याची हकिकत यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात आहे.
46त्याचे वडिल आसा राज्य करीत असताना जे पुरुषगमन करणारे राहून गेले होते त्यांना यहोशाफाटाने त्यांना हाकलून लावले.
47याच काळात अदोम प्रदेशाला राजा नव्हता. एक कारभारीच इथला कारभार पाहत असे. त्याची नेमणूक यहूदाचा राजा करी.
48राजा यहोशाफाटाने तार्शीशी काही मालवाहू गलबते बांधली. त्यामध्ये त्याचा हेतू ओफिरहून सोने आणण्याचा होता. पण ती तेथपर्यंत कधी पोहोंचू शकली नाहीत कारण एसयोन-गेबेरच्या बंदरात त्यांची नासधूस करण्यात आली.
49इस्राएलाचा राजा अहाबाचा पुत्र अहज्या याने यहोशाफाटाला मदतीचा हात दिला. “त्याच्या मनुष्यांबरोबर आपले खलाशी देण्याची तयारी दर्शवली.” पण अहज्याची कुमक स्विकारण्यास यहोशाफाटाने नकार दिला.
50यहोशाफाट मरण पावला त्यानंतर दावीद नगरात आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोराम राज्य करु लागला.
51अहज्या अहाबाचा पुत्र होता. यहोशाफाटाच्या यहूदावरील सत्तेच्या सतराव्या वर्षी अहज्या इस्राएलाचा राजा झाला. शोमरोन मध्ये त्याने दोन वर्षे राज्य केले.
52अहज्याने परमेश्वराचे अनेक अपराध केले. आपले वडिल अहाब, आई ईजबेल आणि नबाटाचा पुत्र यराबाम या सगळ्यांनी जे केले तेच याने केले. या सर्व राज्यकर्त्यांनी इस्राएली लोकांस आणखी पापात लोटले.

Read 1 राजे 221 राजे 22
Compare 1 राजे 22:44-521 राजे 22:44-52