3ते तुझे महान आणि भयचकीत करणाऱ्या नावाची स्तुती करोत. तो पवित्र आहे.
4राजा बलवान आहे आणि तो न्यायप्रिय आहे. तू सरळपणा स्थापिला आहे; तू याकोबात न्याय व निती अस्तित्वात आणली आहेस.
5परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि त्याच्या पदासनाजवळ त्याची उपासना करा. तो पवित्र आहे.
6त्याच्या याजकामध्ये मोशे आणि अहरोन हे होते, आणि त्यास प्रार्थना करणाऱ्यांपैकी शमुवेल हा होता. त्यांने परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
7तो त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलला. त्यांनी त्याच्या आज्ञा आणि त्याचे नियम पाळले.
8हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस. तू त्यांना क्षमा करणारा देव आहेस तरी त्यांच्या पापमय कृत्याबद्दल त्यांना शिक्षा करीत होतास.