1परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी आनंदित होवो. अनेक द्वीपसमूह आनंदित होवो.
2ढग आणि काळोख त्याच्याभोवती आहेत. निती व न्याय त्याच्या सिंहासनाचा पाया आहेत.
3अग्नी त्याच्यापुढे चालतो, आणि प्रत्येक बाजूने त्याच्या शत्रूंना नष्ट करून टाकतो.
4त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले; पृथ्वी हे पाहून थरथर कापली.
5परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर पर्वत मेणासारखे वितळले.