9हे माझ्या सामर्थ्या, मी तुझ्याकडे लक्ष देईन; कारण देवच माझा उंच बुरूज आहे.
10माझा देव मला त्याच्या कराराच्या विश्वसनीयतेने भेटेल; माझ्या शत्रूवर माझी इच्छा पूर्ण झालेली देव मला पाहू देईल.
11त्यांना जिवे मारू नको नाहीतर माझे लोक विसरून जातील; हे प्रभू तू आमची ढाल आहेस, आपल्या बलाने त्यांची दाणादाण कर, त्यांस खाली पाड.
12कारण त्यांच्या तोंडचे पाप आणि त्यांच्या ओठांचे शब्द, आणि त्यांनी अभिव्यक्त केलेले शाप आणि खोटेपणा यामुळे ते आपल्या अंहकारात पकडले जातात.