9मोठ्या सभेत मी न्यायीपणाचे शुभवर्तमान घोषित केले. परमेश्वरा, तुला माहित आहे.
10तुझे न्यायीपण मी आपल्या हृदयात लपवून ठेवले नाही. तुझा विश्वासूपणा आणि तुझे तारण मी घोषित केले. तुझी प्रेमदया किंवा सत्य मी मोठ्या सभेत लपवून ठेवले नाही.
11यास्तव हे परमेश्वरा, तू तुझी दयाळूपणाची कृत्ये माझ्यापासून आवरून धरू नको. तुझी प्रेमदया आणि तुझी सत्यता मला नेहमीच राखो.
12कारण असंख्य वाईटाने मला वेढले आहे. मी वर पाहण्यास सक्षम नाही, कारण माझ्या अपराधांनी मला गाठले आहे. माझ्या डोक्यावर असलेल्या केसांपेक्षा ते जास्त आहेत. म्हणून माझे हृदय खचले आहे.
13परमेश्वरा, मला वाचवायला हर्षित हो. परमेश्वरा, मला मदत करण्यास त्वरा कर.
14जे माझ्या जीवाचा नाश करण्यास माझ्या पाठीस लागले आहेत, ते लज्जित केले जावोत आणि गोंधळून जावोत.
15हा! हा! हा! असे जे मला म्हणतात, ते आपल्या लज्जेमुळे चकित होवोत.
16परंतु जे सर्व तुला शोधतात, ते तुझ्यामध्ये हर्ष व आनंद करोत. ज्या सर्वांना तुझे तारण प्रिय आहे ते सर्व परमेश्वराचा महिमा वाढो, असे नेहमी म्हणोत.
17मी गरीब आणि दीन आहे, तरी प्रभू माझा विचार करतो. तू माझे साहाय्य आणि मला वाचवणारा आहेस. माझ्या देवा, उशीर करू नकोस.