6खचित प्रत्येक मनुष्य हा सावलीसारखा चालतो, खचित प्रत्येकजण संपत्ती साठवण्यासाठी घाई करतो, पण त्यांना हे कळत नाही कोणास ते प्राप्त होणार.
7हे प्रभू, आता मी कशाची वाट पाहू? तूच माझी एक आशा आहेस!
8माझ्या अपराधांवर मला विजय दे, मला मूर्खांच्या अपमानाची वस्तू होऊ देऊ नको.
9मी मुका राहिलो, मी आपले तोंड उघडले नाही. कारण हे तुच केले आहेस.