4परमेश्वर न्यायी आहे; त्याने दुष्टांच्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत.
5जे सियोनेचा तिरस्कार करतात, ते सर्व लज्जित होवोत आणि माघारी फिरवले जावोत.
6ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच सुकून जाते त्यासारखे होवोत.
7त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही, किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही.
8त्यांच्या जवळून येणारे जाणारे म्हणत नाहीत की, “परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर असो; परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो.”