Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - यहो. - यहो. 24

यहो. 24:19-33

Help us?
Click on verse(s) to share them!
19परंतु यहोशवाने लोकांस सांगितले, “तुम्ही परमेश्वर देवाची सेवा करू शकणार नाही; कारण की तो पवित्र देव आहे. तो ईर्ष्यावान देव आहे; तो तुमच्या अधर्माची व तुमच्या पापांची क्षमा करणार नाही. त्याने तुमचे चांगले केले तो तुम्हाला भस्म करेल.
20जर तुम्ही परमेश्वरास सोडून आणि परक्या देवांची सेवा कराल, तो उलटून तुमचे वाईट करील, तुमची हानीही करील.”
21तेव्हा लोकांनी यहोशवाला म्हटले, “असे नाही, आम्ही परमेश्वराची सेवा करू.”
22तेव्हा यहोशवा लोकांस म्हणाला, “तुम्ही आपल्या स्वतःचे साक्षी आहात, तुम्ही परमेश्वराची सेवा करण्यास त्यास आपल्यासाठी निवडून घेतले आहे.” ते म्हणाले, “आम्ही साक्षी आहोत.”
23“असे आहे तर आता तुमच्यामध्ये जे परके देव असतील, ते तुम्ही दूर करा, आणि आपले अंतःकरण इस्राएलाचा देव परमेश्वर याकडे लावा.”
24तेव्हा लोकांनी यहोशवाला म्हटले, “आमचा देव परमेश्वर याची सेवा आम्ही करू; आम्ही त्याची वाणी ऐकू.”
25त्याच दिवशी यहोशवाने लोकांबरोबर करार केला, आणि शखेमात त्याठिकाणी नियम व कायदे स्थापले.
26तेव्हा यहोशवाने ही वाक्ये देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिली, आणि मोठी धोंड घेऊन, तेथे परमेश्वराच्या पवित्र स्थानी जे एला झाड, त्याच्याखाली ती उभी केली.
27आणि यहोशवाने सर्व लोकांस म्हटले, “पाहा, ही धोंड आमच्याविषयी साक्षीदार होईल, कारण की परमेश्वराने आपली जी सर्व वचने आमच्याजवळ सांगितली ती हिने ऐकली आहेत; तर ही तुमच्याविषयी साक्षीदार यासाठी व्हावी की तुम्ही आपल्या देवाला कधी नाकारू नये.”
28मग यहोशवाने लोकांस त्यांना त्यांच्या वतनाकडे रवाना केले.
29मग या गोष्टी झाल्यावर असे झाले की नूनाचा पुत्र परमेश्वराचा सेवक यहोशवा एकशेदहा वर्षांचा होऊन मेला.
30मग त्याच्या वतनाच्या सीमेत एफ्राइमाच्या डोंगरवटीवर जे तिम्नाथ-सेरह आहे त्यामध्ये, गाश डोंगराच्या उत्तरेस लोकांनी त्यास पुरले.
31आणि यहोशवाच्या सर्व दिवसात, आणि जे वडील यहोशवाच्या मागे अधिक आयुष्य पावले, म्हणजे परमेश्वराने आपले जे काम इस्राएलासाठी केले होते, ते अवघे ज्यांनी पाहिले होते, त्यांच्या सर्व दिवसात इस्राएलांनी परमेश्वराची सेवा केली.
32आणि शखेमात जो शेतभूमीचा भाग याकोबाने शखेमाचा बाप हमोर याच्या संतानांजवळून शंभर रुप्याच्या तुकड्यावर विकत घेतला होता, आणि जो योसेफाच्या संतानांच्या वतनाचा झाला त्यामध्ये, योसेफाची जी हाडे इस्राएली लोकांनी मिसर देशातून वर आणली होती, ती त्यांनी पुरली.
33आणि अहरोनाचा पुत्र एलाजार मेला, तेव्हा त्याचा पुत्र फिनहास याची टेकडी जी एफ्राइमाच्या डोंगरवटीत, त्यास दिली होती, तिजवर त्यांनी त्यास पुरले.

Read यहो. 24यहो. 24
Compare यहो. 24:19-33यहो. 24:19-33