12ते म्हणाले, देवाची निवासस्थाने आपण आपल्या ताब्यात घेऊ.
13हे माझ्या देवा, तू त्यांना वावटळीच्या धुरळ्यासारखे, वाऱ्यापुढील भुसासारखे तू त्यांना कर.
14अग्नी जसा वनाला जाळतो, व ज्वाला जशी डोंगराला पेटवते.
15तसा तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर, आणि आपल्या तुफानाने त्यांना घाबरून सोड.
16हे परमेश्वरा, त्यांची चेहरे लज्जेने भर यासाठी की, त्यांनी तुझ्या नावाचा शोध करावा.