Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 83

स्तोत्र. 83:1-9

Help us?
Click on verse(s) to share them!
1आसाफाचे स्तोत्र हे देवा, गप्प राहू नकोस. हे देवा, आमच्याकडे दुर्लक्ष करू नको आणि स्वस्थ राहू नकोस.
2पाहा, तुझे शत्रू गलबला करीत आहेत, आणि जे तुझा द्वेष करतात त्यांनी आपले डोके उंच केले आहे.
3ते तुझ्या लोकांविरूद्ध गुप्त योजना आखतात. आणि ते एकत्र मिळून तुझ्या आश्रितांविरूद्ध योजना करतात.
4ते म्हणतात, “या आणि आपण त्यांचा एक राष्ट्र म्हणून नाश करू. यानंतर इस्राएलाचे नावही आणखी आठवणित राहणार नाही.
5त्यांनी एकमताने, एकत्र मिळून मसलत केली आहे, ते तुझ्याविरूद्ध करार करतात.
6ते तंबूत राहणारे अदोमी आणि इश्माएली, मवाब आणि हगारी,
7गबाल, अम्मोन व अमालेकचे, पलिष्टी आणि सोरकर हे ते आहेत.
8अश्शूरानेही त्यांच्याशी करार केला आहे; ते लोटाच्या वंशजांना मदत करीत आहेत.
9तू जसे मिद्यानाला, सीसरा व याबीन यांना किशोन नदीजवळ केलेस तसेच तू त्यांना कर.

Read स्तोत्र. 83स्तोत्र. 83
Compare स्तोत्र. 83:1-9स्तोत्र. 83:1-9