1आसाफाचे स्तोत्र खात्रीने देव इस्राएलास चांगला आहे, जे अंतःकरणाने शुद्ध आहेत.
2पण माझ्यासाठी जसे माझे पाय बहुतेक निसटणार होते; माझे पाय बहुतेक माझ्या खालून निसटणार होते.
3कारण जेव्हा मी दुष्टांचा भरभराट पाहिला तेव्हा मी गर्विष्ठांचा मत्सर केला.
4कारण त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना वेदना होत नाही, पण ते बलवान आणि चांगले पुष्ट असतात.
5दुसऱ्या मनुष्याच्या भारापासून मुक्त असतात; ते दुसऱ्या मनुष्यासारखे जुलूमात नसतात.
6अभिमानाने ते त्यांच्या गळ्याभोवती असलेल्या हाराप्रमाणे आपल्याला सुशोभित करतात; झग्यासारखा ते हिंसाचाराचे वस्र घालतात.
7अंधत्वातून असे पाप बाहेर येते; वाईट विचार त्यांच्या अंतःकरणातून निघतात.
8ते माझी चेष्टा करून वाईट गोष्टी बोलतात; ते गर्वाने हिंसाचाराची धमकी देतात.
9ते आकाशाविरूद्ध बोलतात, आणि त्यांची जीभ पृथ्वीतून भटकते.
10म्हणून देवाचे लोक त्यांच्याकडे वळतात आणि त्यांच्या वचनातले पाणी भरपूर पितात.
11ते म्हणतात, “देवाला हे कसे माहित होणार? काय चालले आहे ते देवाला कसे कळते?”
12पाहा हे लक्षात घ्या, हे लोक दुष्ट आहेत; ते नेहमी चिंतामुक्त असून धनवान झाले आहेत.
13खचित मी आपले हृदय जपले, आणि आपले हात निरागसतेत धुतले हे व्यर्थ आहे.