28जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत, आणि नितिमानांबरोबर त्यांची नावे लिहिली न जावोत.
29पण मी गरीब आणि दु:खी आहे; हे देवा, तुझे तारण मला उंचावर नेवो.
30मी देवाच्या नावाची स्तुती गाणे गाऊन करीन, आणि धन्यवाद देऊन त्यास उंचाविन.
31ते बैलापेक्षा, शिंगे असलेल्या, किंवा दुभागलेल्या खुराच्या गोऱ्ह्यांपेक्षा परमेश्वरास आवडेल.