7परंतु देव त्यांच्यावर बाण सोडील; अचानक ते त्याच्या बाणाने जखमी होतील.
8त्यांचीच जीभ त्यांच्याविरुद्ध होऊन ते अडखळविले जातील; जे सर्व त्यांना पाहतील ते आपले डोके डोलवतील.
9सर्व लोक भितील आणि देवाची कृत्ये जाहीर करतील. ते सूज्ञतेने त्याने जे काही केले त्याविषयी विचार करतील.
10परमेश्वराच्या ठायी नीतिमान आनंद करतील आणि त्याच्यात आश्रय घेतील; सर्व सरळमार्गी त्याच्यात अभिमान बाळगतील.