9मला बळकट नगरात कोण नेईल? मला अदोमात कोण नेईल?
10हे देवा, तू आम्हास नाकारले नाही? परंतु तू आमच्या सैन्याबरोबर लढाईत गेला नाहीस.
11तू आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत कर, कारण मनुष्याचे सहाय्य निष्फळ आहे.
12आम्ही देवाच्या मदतीने विजयी होऊ; तो आमच्या शत्रूला आपल्या पायाखाली तुडविल.