Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 37

स्तोत्र. 37:1-6

Help us?
Click on verse(s) to share them!
1दाविदाचे स्तोत्र. दुष्टकृत्ये करणाऱ्यांवर चिडू नकोस, जे अनीतीने वागतात त्यांचा हेवा करू नकोस.
2कारण ते लवकरच गवतासारखे वाळून जातील; व हिरव्या वनस्पतीसारखे सुकून जातील.
3परमेश्वरावर विश्वास ठेव आणि जे चांगले आहे ते कर; देशात स्थिर हो आणि विश्वासूपणाने आपला व्यवसाय कर.
4परमेश्वरामध्ये आनंद कर, आणि तो तुला तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देईल.
5तू आपला मार्ग परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो तुझ्याकडून कृती करील.
6तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे आणि तुझा निष्पापपणा मध्यान्हाप्रमाणे दाखवील.

Read स्तोत्र. 37स्तोत्र. 37
Compare स्तोत्र. 37:1-6स्तोत्र. 37:1-6