Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 30

स्तोत्र. 30:2-10

Help us?
Click on verse(s) to share them!
2हे परमेश्वरा, मी तुला मदतीस हाक मारली आणि तू मला बरे केले.
3हे परमेश्वरा तू माझ्या जीवाला मृतलोकांतून वर काढून आणलेस. मी खाचेत उतरू नये, म्हणून तू मला जिवंत राखले आहे.
4जे तुम्ही विश्वासयोग्य आहा, ते तुम्ही परमेश्वरास स्तुती गा. त्याची पवित्रता स्मरून त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
5कारण त्याचा राग काही क्षणाचा आहे, परंतु त्याचा अनुग्रह आयुष्यभर आहे. रडने कदाचीत रात्रभर असेल, परंतु सकाळी हर्ष होईलच.
6मी आत्मविश्वासात म्हणालो, मी कधीही ढळणार नाही.
7होय, परमेश्वरा तुझ्या अनुग्रहाने मला बळकट पर्वतासारखे स्थापले आहे. परंतु जेव्हा तू आपले मुख लपवतोस तेव्हा मी भयभीत होतो.
8परमेश्वरा, मी तुझ्याकडे आरोळी केली आणि माझ्या प्रभू कडून अनुग्रह मागितला.
9मी मरण पावल्यावर खाली थडग्यात गेलो तर काय लाभ? माती तुझी स्तुती करणार काय? ती तुझी विश्वासयोग्यता सांगेल काय?
10हे परमेश्वरा, ऐक आणि माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा, मला मदत करणारा हो.

Read स्तोत्र. 30स्तोत्र. 30
Compare स्तोत्र. 30:2-10स्तोत्र. 30:2-10